मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /कधीच डाउनलोड करू नका WhatsApp चं हे नकली वर्जन, बॅन होऊ शकतं अकाउंट

कधीच डाउनलोड करू नका WhatsApp चं हे नकली वर्जन, बॅन होऊ शकतं अकाउंट

जर तुम्ही मेसेजचा रिप्लाय नोटिफिकेशनमधूनच दिला, तर समोरच्या व्यक्तीला किंवा इतरांनाही तुम्ही ऑनलाइन असल्याचं दिसणार नाही.

जर तुम्ही मेसेजचा रिप्लाय नोटिफिकेशनमधूनच दिला, तर समोरच्या व्यक्तीला किंवा इतरांनाही तुम्ही ऑनलाइन असल्याचं दिसणार नाही.

अनेक थर्ड पार्टी डेव्हलपर्स WhatsApp चे मॉडिफाइड घेऊन येतात. यात असे फीचर्स Add केले गेले आहेत, जे WhatsApp मध्ये नाहीत.

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : WhatsApp ने केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग App आहे. WhatsApp ला इतकी लोकप्रियता असूनही App मध्ये अद्यापही अनेक फीचर्स नाहीत. परंतु WhatsApp मध्ये नसलेले अनेक फीचर्स याच्या डुप्लिकेट प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. अनेक थर्ड पार्टी डेव्हलपर्स WhatsApp चे मॉडिफाइड घेऊन येतात. यात असे फीचर्स Add केले गेले आहेत, जे WhatsApp मध्ये नाहीत. असंच एक डेल्टा लॅब्स स्टूडिओ App आहे, ज्याला WhatsApp Delta किंला GB WhatsApp Delta असं म्हणतात.

हे App WhatsApp सारखंच दिसतं, पण यात अधिक मजेशीर फीचर्स देण्यात आले आहेत. WhatsApp आपल्या App च्या मॉडिफाइड वर्जनची परमिशन देत नाही. त्यामुळे एखाद्या युजरने हे डुप्लिकेट मॉडिफाइड वर्जन डाउनलोड केलं, तर त्या युजरचं अकाउंट तात्पुरत्या स्वरुपात बॅन केलं जाऊ शकतं.

Google चं नवं अपडेट, आता तुमचं अकाउंट अधिक सुरक्षित होणार; पाहा प्रोसेस

काय आहे WhatsApp Delta आणि GB WhatsApp?

Google Play Store आणि Apple App Store वर WhatsApp Delta किंवा GB WhatsApp डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध नाही. हे दोन्ही App Store मॉडिफाइड App ला पब्लिश करण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी परवानगी देत नाही.

फोनमध्ये असा होतोय Ransomwareअटॅक,हॅकर्सकडून मोबाइल लॉक करुन होतेय पैशांची मागणी

Play Store वर Delta labs Studio चे काही Apps दिसतात. थर्ड पार्टी App Store च्या माध्यमातून हे मॉडिफाइड वर्जन WhatsApp डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. Android Smartphone साठी याची APK फाइल अनेक वेबसाइटवर उपलब्ध आहे.

First published:
top videos

    Tags: Tech news, Whatsapp News, WhatsApp user