नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर: विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) हे त्यांच्या वैविध्यपूर्ण फीचर्समुळे कायम चर्चेत असतात. आज सोशल मीडिया अॅप्स वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. वैयक्तिक आयुष्यातील घटनांपासून ते एखाद्या उत्पादनाच्या जाहिरातीपर्यंत सर्वच गोष्टी सोशल मीडिया अॅप्सच्या माध्यमातून युजर्स लोकांपर्यंत किंवा फॉलोअर्सपर्यंत पोहोचवत असतात. अर्थात या सर्व गोष्टींना मिळणारा प्रतिसादही मोठा असतो. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, टेलिग्राम हे त्यातील लोकप्रिय सोशल मीडिया अॅप्स म्हणता येतील. इन्स्टाग्रामवर (Instagram New Feature) युजर्स प्रामुख्यानं फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. यापूर्वी केवळ App च्या माध्यमातून पोस्ट करता येत असे, मात्र आता डेस्कटॉप (Desktop) किंवा लॅपटॉपच्या (Laptop) माध्यमातूनही हे फीचर वापरता येणार आहे. युजर्ससाठी हे नवं अपडेट महत्त्वपूर्ण म्हणता येईल. फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामने आता युजर्सला डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवरून पोस्ट शेअर (Share) करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्स त्यांच्या डेस्कटॉप अॅपवरून एक मिनिटापर्यंत कालावधी असलेला व्हिडीओ किंवा फोटो पोस्ट करू शकणार आहेत. आतापर्यंत इन्स्टाग्राम युजर्स केवळ स्मार्टफोनच्या माध्यमातूनच पोस्ट करू शकत होते. वाचा- Passport काढण्यासाठी सरकारी Umang App करेल मदत, असं करा अप्लाय फेसबुकची मालकी असलेल्या इन्स्टाग्रामनं प्रथम डेस्कटॉप ब्राउजरवरून पोस्ट करण्याबाबत टेस्टींग केली होती. त्यानंतर आता हे फीचर युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. इनगॅझेटच्या अहवालानुसार, इन्स्टाग्रामनं नवा अपडेट जारी केला आहे. या अपडेटमुळं युजर्स 21 ऑक्टोबरपासून कॉम्प्युटर ब्राउजरच्या माध्यमातून फोटो आणि छोटे व्हिडीओ (एक मिनिटापेक्षा कमी कालावधी असलेले) पोस्ट करू शकणार आहेत. क्रिएटर्स करू शकणार ‘कोलॅब’ या नव्या फीचरसोबतच इन्स्टाग्राम लवकरच क्रिएटर्ससाठी त्यांच्या पोस्ट आणि रिल्स कोलॅबरेट (Collaborate) म्हणजे एकत्र करण्यासाठी एक नवा ऑप्शन उपलब्ध करून देणार आहे. या ‘कोलॅब’ फीचरचा वापर करत क्रिएटर्स दुसऱ्या अकाउंटसला त्यांच्यासोबत पोस्ट कोलॅबरेट करण्यासाठी इन्व्हाइट म्हणजेच आमंत्रित करू शकणार आहेत. यासाठी युजर्सला इन्स्टाग्रामच्या मेन्यूमध्ये जात संबंधित अकाउंटला टॅग करावं लागेल.
You 🤝 Me
— Instagram (@instagram) October 19, 2021
We’re launching Collabs, a new way to co-author Feed posts and Reels.
Invite an account to be a collaborator:
✅Both names will appear on header
✅Share to both sets of followers
✅Live on both profile grids
✅Share views, likes and comments pic.twitter.com/0pBYtb9aCK
जेव्हा समोरील अकाउंट ही टॅग (Tag) स्विकारेल तेव्हाच दोन्ही अकाउंटसला व्ह्यूज, लाइक आणि कमेंटस करता येईल. यामुळे पोस्ट आणि रिल्स दोन्ही अकाउंटच्या फॉलोअर्स पर्यंत पोहोचेल. मात्र सध्या हे फिचर टेस्टींग फेजमध्ये असून, पूर्णतः रोलआउट झालेलं नाही. काही लोकांना सध्या या फिचरचा अॅक्सेस देण्यात आला आहे. हे फिचर जागतिकस्तरावर रोलआऊट करण्यासाठी अद्याप तारीख निश्चित झालेली नाही.