नवी दिल्ली, 16 मार्च : 1 एप्रिलपासून तुमचा खर्च वाढू शकतो. नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया (NHAI) टोल दरात जवळपास 5 टक्के वाढ करू शकते. त्याशिवाय जे लोक टोल प्लाजासाठी मासिक पास बनवतात त्यावरही 10 ते 20 रुपयांची वाढ केली जाऊ शकते. NHAI प्रत्येक आर्थिक वर्षात टोल टॅक्समध्ये वाढ करतं. अशात या वर्षीही नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया, हायवेवर गाडी चालवण्यासाठी टोल टॅक्स वाढवू शकते.
रस्तावरील वाहतूक आणि ट्रान्सपोर्टेशन महागणार -
टोल प्लाजावर 5 टक्के वाढीचा थेट परिणाम रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या लोकांवर होईल. सर्व राज्यातील परिवहन विभागाकडून टोल वाढण्यात येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय ट्रान्सपोर्टेशनही महागणार आह. ज्यामुळे भाज्या, फळं आणि दुधासारख्या आवश्यक गोष्टीही महागण्याची शक्यता आहे.
रिपोर्ट्सनुसार, गोरखपूरमधील तीन टोल प्लाजावर 5 ते 30 रुपयांची वाढ होईल. तसंच मासिक टोलवरही 10 ते 20 रुपये वाढ होईल. NHAI गोरखपूर झोनचे प्रोजेक्ट डायरेक्टर द्वीवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, टोल टॅक्स दरवर्षी फायनेंशियल ईयरमध्ये वाढवला जातो. नवीन रेट 1 एप्रिलपासून लागू होईल. यासाठी मुख्यालयात प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
FASTag इलेक्ट्रिक टोल कलेक्शन सिस्टममुळे टोल प्लाजावर वेटिंग टाईम कमी करण्याचा दावा केला आहे. तसंच यामुळे इंधनाचा वापरही कमी होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्व वाहनांनी FASTag चा वापर करुन नॅशनल हायवेवर प्रवास केल्यास, भारत दरवर्षी पेट्रोल आणि डिझेलवर 20000 कोटी रुपयांची बचत करेल, असं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Compulsory, Fastag, Money, Tech news, Toll plaza