मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /ड्रायव्हिंग लायसन्ससह वाहन नोंदणीबाबत मोठी बातमी, हे काम पूर्ण न केल्यास द्यावा लागेल दंड

ड्रायव्हिंग लायसन्ससह वाहन नोंदणीबाबत मोठी बातमी, हे काम पूर्ण न केल्यास द्यावा लागेल दंड

गेल्या वर्षी कोरोना काळात, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसंच, लोकांच्या समस्या पाहता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहनांच्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांची वैधता 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली होती.

नवी दिल्ली, 16 मार्च : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने कोरोना साथीच्या कारणास्तव गेल्या वर्षी 1 फेब्रुवारीनंतर एक्सपायर्ड झालेले ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, फिटनेस सर्टिफिकेट आणि पीयूसी 31 मार्च 2021 पर्यंत वैध केलं होतं. जर अद्यापही ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनासंबंधी आवश्क कागदपत्र रिन्यू केले नसतील, तर सर्व कागदपत्र 31 मार्चपर्यंत रिन्यू करणं गरजेचं आहे. अन्यथा दंड भरावा लागू शकतो.

गेल्या वर्षी कोरोना काळात, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कागदपत्रांसाठीची वैधता वाढवण्यात आली होती. त्यावेळी देशातील सर्व शहरातील आरटीओ ऑफिसमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी आणि फिटनेस सर्टिफिकेटबाबत अनेक प्रकरणं प्रलंबित होती. अशात लोकांच्या समस्या पाहता तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहनांच्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांची वैधता 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली होती.

(वाचा - Petrol-Diesel च्या वाढत्या किंमतीवर लगाम लागणार; सरकारचा मोठा प्लॅन)

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निवेदनात असं म्हटलं होतं की, मोटर वाहन अधिनियम 1988 आणि केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 अंतर्गत वाहनांचं फिटनेस सर्टिफिकेट, लायसन्स, परमिट, नोंदणी आणि इतर कागदपत्रांची वैधता 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशव्यापी लॉकडाउन काळात ज्या वाहनांच्या कागदपत्रांची वैधता 2020 मध्ये संपली आहे, ती कागदपत्र 31 मार्च 2021 पर्यंत वैध मानली जातील.

(वाचा - वाहनांवर स्क्रॅपिंग पॉलिसीचे सर्वसामान्यांना होणार हे 5 मोठे फायदे; पाहा डिटेल्स)

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 31 मार्चनंतर वाहनासंबंधी कोणत्याही कागदपत्रांची वैधता मान्य करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता कागदपत्र 31 मार्चपूर्वी रिन्यू करणं आवश्यक आहे.

First published:
top videos

    Tags: Auto expo, Tech news, Technology, While driving