जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / जबरदस्त! भारतीय विद्यार्थ्याने जिंकलं NASA चं मून टू मार्स डेव्हलपमेंट अ‍ॅप चॅलेंज; बनवलं हे खास App

जबरदस्त! भारतीय विद्यार्थ्याने जिंकलं NASA चं मून टू मार्स डेव्हलपमेंट अ‍ॅप चॅलेंज; बनवलं हे खास App

जबरदस्त! भारतीय विद्यार्थ्याने जिंकलं NASA चं मून टू मार्स डेव्हलपमेंट अ‍ॅप चॅलेंज; बनवलं हे खास App

नासाकडून आयोजित केलेलं हे अतिशय गुंतागुंतीचं कोडिंग चॅलेंज होतं. या स्पर्धेंतर्गत विद्यार्थ्यांना एक असं मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार करायचं होतं, ज्यात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणं आणि तेथे तपासणी मोहिमेची रुपरेषा तयार केली जाऊ शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 10 जानेवारी : भारतीय विद्यार्थांनी अनेकदा आपल्या देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावलं आहे. आता पुन्हा एकदा एका हायस्कूलच्या भारतीय विद्यार्थ्याने अंतराळ क्षेत्रात (Space Science) भारताची मान उंचावली आहे. या विद्यार्थ्याने आणि त्याच्या टीमने अमेरिकन अंतराळ संस्था नासाकडून (NASA) आयोजित केलेल्या आर्मेटिस नेक्स्ट-जेन एसटीईएम-मून टू मार्स अ‍ॅप डेव्हलपमेंट चॅलेंज जिंकलं आहे. आर्यन जैन असं नासाचं चॅलेंज जिंकलेल्या या विद्यार्थ्याचं नाव आहे. हा गुरुग्रामच्या सनसिटी शाळेचा विद्यार्थी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नासा कडून आयोजित केलेलं हे अतिशय गुंतागुंतीचं कोडिंग चॅलेंज होतं. यावर्षी नासाच्या स्पेस कम्यूनिकेशन्स अँड नेव्हिगेशन्सने (SCan) स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेंतर्गत विद्यार्थ्यांना एक असं मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार करायचं होतं, ज्यात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणं आणि तेथे तपासणी मोहिमेची रुपरेषा तयार केली जाऊ शकते.

(वाचा -  Whatsapp ला नवा पर्याय; भारतात गुगल प्ले स्टोरवर नंबर 1 फ्री App ठरलं Signal )

आर्यन जैन टीम यूनिटी नावाच्या टीमचा सदस्य होता. त्याच्या टीममध्ये त्याच्याशिवाय अनिका पटेल, अँडी वांग, फ्रॅंकलिन हो, जेनिफर जियोंग, जस्टिन जी आणि वेदिका कोठारी सामिल होते. हे अमेरिकेतील व्हिटनी हायस्कूलच्या नेतृत्वाखाली 5 ग्लोबल शाळांच्या एकत्रित टीममध्ये होते. आता या टीममधील सर्व सदस्यांना फेब्रुवारीमध्ये नासाचे वैज्ञानिक आणि अवकाश क्षेत्रातील मोठ्या लोकांशी चर्चा करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे.

(वाचा -  पुजाऱ्याशी लग्न केल्यास गरीब ब्राम्हण वधूला मिळणार 3 लाख;कर्नाटक सरकारची योजना )

आर्यन जैन आणि त्याच्या टीमद्वारे तयार करण्यात आलेल्या अ‍ॅपमध्ये अनेक फीचर्स आहेत. यात एक छोटा मॅप आहे. हा मॅप चंद्रावर उतरण्याच्या मिशनवेळी अंतराळवीरांना तांत्रिकदृष्ट्या मदत करेल. अ‍ॅपमध्ये रस्ता माहित करण्याचा पर्याय, चंद्राच्या पृष्ठभागाचं चित्रण आणि 3D सीनही आहे. टीमने हे अ‍ॅप तयार करण्यासाठी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उपलब्ध असलेल्या सर्व माहितीचा वापर केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: nasa
  • First Published :
जाहिरात
जाहिरात