जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Titan चं Smart Glass लाँच; सेल्फी, गाणी ऐकण्यासह मिळणार जबरदस्त सुविधा

Titan चं Smart Glass लाँच; सेल्फी, गाणी ऐकण्यासह मिळणार जबरदस्त सुविधा

Titan चं Smart Glass लाँच; सेल्फी, गाणी ऐकण्यासह मिळणार जबरदस्त सुविधा

Titan ने Titan EyeX नावाचा स्मार्ट चष्मा बाजारात लाँच केला आहे. हे स्मार्ट ग्लास सनग्लासेस, स्पेक्टेकल्स किंवा कंप्यूटर ग्लासप्रमाणे वापरता येतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 जानेवारी : आयकेयर सेक्टरमधील प्रमुख कंपनी टायटनने (Titan Eye+) स्मार्ट ग्लास लाँच केलं आहे. Titan ने Titan EyeX नावाचा स्मार्ट चष्मा बाजारात लाँच केला आहे. हे स्मार्ट ग्लास सनग्लासेस, स्पेक्टेकल्स किंवा कंप्यूटर ग्लासप्रमाणे वापरता येतात. त्याशिवाय याद्वारे गाणीही ऐकता येतात, फोन कॉलही ऐकता येतात. या स्मार्ट चष्मात ऑडियो, टच कंट्रोल आणि फिटनेससारखे अनेक फीचर्स आहेत. Titan EyeX Smart Glass स्मार्टफोनप्रमाणे क्वॉलकॉम प्रोसेसरद्वारे ऑपरेटही होतात. हे Smart Glass एका App द्वारे अँड्रॉइड आणि iOS दोन्ही फोनशी जोडता येतात. या Titan EyeX स्मार्ट ग्लासचं वजन अतिशय कमी आहे. Titan EyeX स्मार्ट ग्लासची किंमत 9999 रुपये आहे. Titan ने दिलेल्या माहितीनुसार, हे स्मार्ट ग्लास एकदा चार्ज झाल्यानंतर आठ तासांपर्यंत बॅटरी लाइफ देऊ शकतात. Titan EyeX स्मार्ट ग्लास Titan Eye+ स्टोर्स आणि Titan Eye+ च्या वेबसाइटद्वारे खरेदी करता येऊ शकतात.

Facebook ची दोन भन्नाट Smartwatch, डिस्प्ले वेगळा होणार, कॅमेरा फिरणार!

काय आहेत स्पेसिफिकेशन्स - Titan ने दिलेल्या माहितीनुसार, Titan EyeX स्मार्ट ग्लासला फोन कॉलची सुविधा देण्यात आली आहे. हा चष्मा घालून तुम्ही फोन कॉल रिसिव्ह करू शकता. यात क्लियर वॉइस कॅप्चर (CVC) टेक्नोलॉजी देण्यात आली असून डायनेमिक वॉल्यूम कंट्रोलसह क्लियर आवाजाची क्वॉलिटी दिली जाते. हा चष्मा ऑडियोसह जोडल्यास, यातील टेक्नोलॉजी आजूबाजूच्या गोंधळाच्या हिशोबाने आवाजाचा स्पीड अॅडजस्ट करते. यात ब्लूटूथ वर्जन 5.0 डायनेमिक वॉल्यूम कंट्रोल देण्यात आला आहे.

Google Maps मधील ‘ही’ जबरदस्त Trick; तुम्हाला माहिती आहे का? एकदा वापरुन पाहाच

या चष्म्याच्या मदतीने तुम्ही सेल्फीही क्लिक करू शकता. त्याशिवाय स्मार्ट ग्लासला ट्रॅकरदेखील देण्यात आला आहे. स्मार्ट ग्लास कुठे विसरल्यास तो ट्रॅकही करता येऊ शकतो. यात चांगल्या ऑडियो क्वॉलिटीसह, टच कंट्रोल, फिटनेस ट्रॅकर, वॉइस इनेबल्ड आयकेयर नोटिफिकेशन, Android-iOS कनेक्टिविटीसाख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news
  • First Published :
जाहिरात
जाहिरात