मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Facebook ची दोन भन्नाट Smartwatch, डिस्प्ले वेगळा होणार, कॅमेरा फिरणार!

Facebook ची दोन भन्नाट Smartwatch, डिस्प्ले वेगळा होणार, कॅमेरा फिरणार!

सध्या तंत्रज्ञानाचं युग असून भारतासह संपूर्ण जगात स्मार्टवॉचला (Smartwatch) खूप मागणी आहे. ग्राहकांची मागणी पाहता अनेक कंपन्या कमी बजेटमधली एकापेक्षा एक दमदार फीचर्ससह स्मार्टवॉचेस लाँच करत आहेत. Facebook म्हणजेच मेटा कंपनीसुद्धा दोन स्मार्टवॉचेस लॉन्च करणार असल्याची माहिती आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 15 जानेवारी : सध्या तंत्रज्ञानाचं युग असून भारतासह संपूर्ण जगात स्मार्टवॉचला (Smartwatch) खूप मागणी आहे. ग्राहकांची मागणी पाहता अनेक कंपन्या कमी बजेटमधली एकापेक्षा एक दमदार फीचर्ससह स्मार्टवॉचेस लाँच करत आहेत. Facebook म्हणजेच मेटा कंपनीसुद्धा दोन स्मार्टवॉचेस लॉन्च करणार असल्याची माहिती आहे. 2022 च्या उन्हाळ्यात ही स्मार्टवॉचेस येण्याची अपेक्षा आहे. या स्मार्टवॉचेसमध्ये गोल स्क्रीन आणि फ्रंट-फेसिंग कॅमेरा असणार आहे. या स्मार्टवॉचेसचे काही फोटो ब्लूमबर्गने ऑक्टोबर 2021 मध्ये जारी केले होते. LetsGoDigital ला आता Meta च्या पहिल्या स्मार्टवॉचबद्दल अधिक माहिती मिळाली आहे. या स्मार्टवॉचेसमध्ये जबरदस्त फीचर्स आहेत.

या स्मार्टवॉचेसमध्ये डिटॅचेबल डिस्प्ले आणि ड्युएल कॅमेरे असणार आहेत. तसंच स्मार्टवॉचद्वारे युझर्सना थेट FB-Insta वर व्हिडिओ शेअर करता येणार आहेत. दोन कॅमेरे असलेल्या स्मार्टवॉचमध्ये VR आणि AR अॅप्लिकेशनसाठी सपोर्ट उपलब्ध असेल.

फेसबुक दोन स्मार्टवॉच लॉन्च करणार आहे, त्यात एक चौकोनी डिस्प्ले आणि दुसऱ्याचा डिस्प्ले गोल असेल. तसंच यात डिटॅचेबल डिस्प्ले, म्हणजेच युजर्स डिस्प्ले काढून टाकू शकतात. या स्मार्टवॉचेसमध्ये मस्त फीचर्स मिळणार आहेत. हार्ट रेट मॉनिटर, मोशन सेन्सर, बॉडी टेम्परेचर सेन्सर आणि अ‍ॅक्टिव्हिटी रेकग्निशन सेन्सरही असेल.

या स्मार्टवॉचेसद्वारे युझर्स व्हिडिओ कॉलदेखील करू शकतील. व्हर्च्युअल रिअॅलिटी, ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि मिक्स्ड रिअॅलिटीसाठीही वॉचमधल्या कॅमेऱ्याचा उपयोग करता येणार आहे. Meta ची Metaverse मध्ये मोठी गुंतवणूक असून स्मार्टवॉच याचा एक भाग व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. बिल्ट-इन कॅमेरा असलेली वॉचेस एआर/व्हीआर सिस्टीमला सपोर्ट करतील. तसंच कंपनी एआर हेडसेटवर काम करत असून वर्षाच्या अखेरीस दोन्ही प्रोडक्ट एकदमच लाँच करू शकते. मेटा एआर ग्लासवरदेखील काम करत असून, त्याचं कोडनेम 'प्रोजेक्ट नजर' असं आहे.

या स्मार्टवॉचमध्ये दोन किंवा तीन कॅमेरे असणार आहेत. वेगवेगळ्या लेन्सचे हे कॅमेरे असतील. मॅक्रो लेन्स, टेलीफोटो लेन्स, ऑप्टिकल झूम लेन्स अथवा वाइड अँगल लेन्स असेल. युझर्स या कॅमेऱ्याद्वारे फिल्ड-ऑफ-व्ह्यू अॅडजस्ट करू शकतील. राउंड क्लॉक डिस्प्ले हा रोटेटेबल असून, त्यात मॅग्नेट असेल. यामुळे युझर्स वॉच फिरवून वेगवेगळे कॅमेरे वापरू शकतील. एक कॅमेरा वापरात असताना, बाकीचे कॅमेरे आपोआप बंद होतील. फेसबुक स्मार्टवॉचचे कॅमेरे युझर्सना फोटो आणि व्हिडिओ काढण्याची सुविधा देत आहेत. कोरोना काळात आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्मार्टवॉच खरेदी करणे ही एक गरज बनली आहे. त्यामुळे स्मार्टवॉचचा ट्रेंडिंग आहेत. त्या दृष्टीने फेसबुक या क्षेत्रात पाऊल टाकत आहे.

First published:

Tags: Facebook, Facebook smartwatch, Smartwatch