मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Google Maps मधील हे feature तुम्हाला माहिती आहे का? ज्यामुळे अनेक कामं होतील सोपी

Google Maps मधील हे feature तुम्हाला माहिती आहे का? ज्यामुळे अनेक कामं होतील सोपी

Google Maps: गुगल मॅप्सचे फायदे जवळपास सर्वांनाच माहिती आहेत. मात्र, याशिवाय गुगल मॅप्सचे असे अनेक फिचर्स (Google Map Features) आहेत ज्याबद्दल अद्याप फारशी माहिती नाही.

Google Maps: गुगल मॅप्सचे फायदे जवळपास सर्वांनाच माहिती आहेत. मात्र, याशिवाय गुगल मॅप्सचे असे अनेक फिचर्स (Google Map Features) आहेत ज्याबद्दल अद्याप फारशी माहिती नाही.

Google Maps: गुगल मॅप्सचे फायदे जवळपास सर्वांनाच माहिती आहेत. मात्र, याशिवाय गुगल मॅप्सचे असे अनेक फिचर्स (Google Map Features) आहेत ज्याबद्दल अद्याप फारशी माहिती नाही.

  नवी दिल्ली, 12 जानेवारी : सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात टेक जायंट 'गुगल' (Google) अतिशय उपयुक्त सेवा देत आहे. गुगलशिवाय आपण आपल्या फास्ट फॉरवर्ड डेली लाईफची कल्पनाही करू शकत नाही. गुगलचे अनेक अ‍ॅप्स (Google Apps) आपलं आयुष्य खूप सुखकर करतात. 'गुगल मॅप्स'चाही (google map) अशाच उपयुक्त अ‍ॅप्समध्ये समावेश होतो. गुगल मॅप्सच्या मदतीनं तुम्ही कोणत्याही अनोळखी ठिकाणी सहज जाऊ शकता. जवळची जिम, रेस्टॉरंट, मार्केट प्लेसपासून ते अगदी तुमची ट्रॅव्हल हिस्ट्रीसुद्धा (Travel History) गुगल मॅप्सच्या मदतीने सेव्ह करता येते. गुगल मॅप्सचे हे फायदे जवळपास सर्वांनाच माहिती आहेत. मात्र, याशिवाय गुगल मॅप्सचे असे अनेक फिचर्स (Google Map Features) आहेत ज्याबद्दल अद्याप फारशी माहिती नाही. आज आपण त्या फिचर्सबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

  अपकमिंग ट्रॅव्हलिंग ऑर्गनाईझ करणं शक्य

  मीटिंग (Meeting), फ्लाइट (Flight) किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जाण्याचं लक्षात रहावं म्हणून गुगल कॅलेंडरचा (Google Calendar) सर्रास वापर केला जातो. मात्र, याच गोष्टी गुगल मॅप्सद्वारेदेखील लक्षात ठेवता येऊ शकतात. गुगल मॅप्समध्येसुद्धा रिमांयडरचं फिचर उपलब्ध आहे. याचा वापर करण्यासाठी, अगोदर गुगल मॅप्स अ‍ॅप ओपन करा, त्यानंतर तळाशी असलेल्या सेव्ह टॅबवर टॅप करा, तिथे तुम्हाला ट्रॅव्हलिंग, बुक्ड फ्लाईट आणि शेड्युल्ड मीटिंगची लिस्ट दिसेल.

  फ्रिक्वेंटली व्हिजिटेड प्लेसेस मॅप्सवर पिन करणं शक्य

  आपल्याला काही ठिकाणी कामानिमित्त किंवा इतर काही कारणास्तव वारंवार जावं लागतं. मात्र, कधी-कधी या ठिकाणांचा शोध घेणं त्रासदायक ठरतं. गुगल मॅप्सकडे या समस्येवरही उपाय आहे. ज्या ठिकाणावर तुम्हाला वारंवार भेट द्यावी (Frequently visited places) लागणार आहे ते ठिकाण तुम्ही मॅप्सवर पिन (Pin) करून नंतर ते पटकन अ‍ॅक्सेस करू शकता. हे फिचर वापरण्यासाठी, मॅप्सच्या तळाशी असलेल्या पिन ऑप्शनवर जावं लागेल. त्यानंतर मुख्य स्क्रीनवर जाऊन गो टॅबवर क्लिक करावं लागेल. मॅप्सवर दाखवलेला अ‍ॅड्रेस तुमचं इच्छित स्थळ असेल तर त्याठिकाणी असलेल्या पुशिंग आयकॉनवर टॅप करून ते पिन करा.

  वाचा : Alert! ...तर कोरोना लशीचा बुस्टर डोस रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

  आवडीचं रेस्टॉरंट सजेशनमध्ये बघणं शक्य

  गुगल मॅप्स तुमच्यासाठी तुमचं आवडीचं रेस्टॉरंट (Restaurant) देखील सुचवू शकतं. जर तुम्ही घराबाहेर जेवण्याचा विचार करत असाल आणि कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जावं, अशा संभ्रमात असाल तर तुम्ही गुगल मॅप्सची मदत घेऊ शकता. यासाठी गुगल मॅप्सवरील रेस्टॉरंट्स टॅबवर क्लिक करा. तिथे तुम्हाला तुमच्या परिसरातील रेस्टॉरंटची यादी दिसेल. त्यासोबत रेस्टॉरंटचं रेटिंग (Rating) आणि रिव्ह्युजदेखील (Reviews) मिळतील. त्या माहितीवरून तुम्ही पुढील निर्णय घेऊ शकता.

  आपलं लोकेशन करा शेअर

  अनेकदा असं होतं की, तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटण्यासाठी बोलवता मात्र, तिला तुमचं लोकेशन सापडत नाही. अशा परिस्थितीमध्येही गुगल मॅप्स तुम्हाला मदत करू शकतो. मॅप्सचा वापर करून तुम्ही तुमचं लाईव्ह लोकेशन (Live Location) कोणाशीही शेअर करू शकता. लोकेशन पाठवण्यासाठी अ‍ॅपमधील ब्लू लोकेशन डॉटवर क्लिक करा. त्यानंतर 'शेअर लोकेशन' या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.

  वाचा : I&B ministry चे ट्विटर अकाउंट काही वेळासाठी हॅक, नाव बदलून केले Elon Musk

  म्युझिक कंट्रोल फिचर

  गुगल मॅप्सच्या मदतीनं तुम्ही म्युझिकदेखील कंट्रोल करू शकता. मॅप्सचा वापर करून ट्रॅक बदलणं, आवाज वाढवणं यासारख्या गोष्टी करता येतात. हे फिचर वापरण्यासाठी, अ‍ॅपच्या सेटिंग्जमध्ये जा. तिथे नेव्हिगेशन सेटिंग्ज हा ऑप्शन निवडा. त्यानंतर असिस्टंट डिफॉल्ट मीडिया प्रोव्हायडरवर क्लिक करा. तिथे तुम्हाला अ‍ॅव्हेलेबल ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. मग तुम्हाला तुमचं म्युझिक प्रोव्हाईडर (Music provider) अ‍ॅप दिसेल, जे तुम्ही पाहिजे तसं कंट्रोल करू शकता.

  अशा प्रकारे तुम्ही विविध कामांसाठी गुगल मॅप्सचा वापर करून तुमची डेली लाईफ आणखी सुखकर करू शकता.

  First published:

  Tags: Google, Technology