नवी दिल्ली, 14 मार्च : थंडीचे दिवस गेले असून आता उन्हाळा सुरू होत आहे. उन्हाळ्याच्या मध्यावर अर्थात मे, जून दरम्यान शहरांत तापमान 35 ते 40 डिग्री किंवा त्याहूनही अधिक होतं. अशात एयर कंडिशनर्स (Air-Conditioner) चांगला पर्याय ठरतो. या उन्हाळ्यात तुम्हीही नवा एसी (AC) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नवा एसी घेताना या गोष्टी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. AC चे दोन प्रमुख प्रकार असतात. ज्यात एक विंडो एसी (Window AC) आणि दुसरा स्पिल्ट एसी (Split AC) असतो. विंडो एसी तुलनेने स्वस्त असतात. तसंच यात स्मार्ट फीचर्सची संख्या मर्यादित असते. हा Window AC बसवणं सोपंही असतं.
हे वाचा - चक्क 400 रुपयांना मिळत आहे AC, कुठे आणि कसं जाणून घ्या?
स्पिल्टएसी चांगल्या डिझाइन आणि अनेक अॅडव्हान्स फीचर्ससह येतो. याचा कंप्रेसर वेगळा असतो. त्यामुळे घरात हा अगदी कॉम्पॅक्ट आणि स्टायलिश दिसतो. या एसीचा आवाज येत नाही. पण हा इन्स्टॉल करणं तुलनेने कठीण होतं. यात लीकेज लवकर समोर येतो. AC खरेदी करण्याआधी आपल्या रुमचा आकार पाहणं, रुमच्या आकारानुसार सिलेक्शन करणं महत्त्वाचं ठरतं. खोलीचा आकार लक्षात घेऊन एसी कॅपेसिटी डिझाइन करणं गरजेचं आहे. 100 स्क्वेयर फूटासाठी 0.8 टन एसीचा वापर करू शकता. तर 1500 स्क्वेयर फूट रुमसाठी 1 टन कॅपेसिटीच्या एसीचा वापर करू शकता.
हे वाचा - विजेचं बिल खूप येतंय? या Tips करा फॉलो, Bill कमी येण्यास होईल मदत
एसीमुळे इलेक्ट्रिसिटी बिलामध्ये (Electricity Bill) मोठ्या प्रमाणात वाढ होते. पण 5-स्टार रेटिंग (5 Star Rating AC) असलेला एअर कंडिशनर सर्वात प्रभावीपणे तुमची खोली थंड करतो आणि वीजही कमी प्रमाणात वापरतो. त्यामुळे एसी खरेदी करताना तो 5-स्टार रेटिंगचा आहे की नाही, याची खात्री करून घेतली पाहिजे. आजकाल स्मार्ट एसीची (Smart AC) चलती आहे. स्मार्ट एसी गारवा आणि वायुप्रवाह यांच्यात परिपूर्ण संतुलन राखतो. स्मार्ट एसी खोलीतील लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवतो आणि त्यांच्या हालचालींना अनुरूप प्रणाली आपोआप अॅक्टिवेट करतो. कूलिंगच्या गरजा समजून घेण्यासोबतच तो विजेचा वापरही कमी करतो.
हे वाचा - केवळ 1400 रुपयांत घरी आणता येईल AC, जबरदस्त फीचर्ससह पाहा काय आहे डील
ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीनुसार (Bureau of Energy Efficiency), एअर कंडिशनरचं सरासरी तापमान 24 अंश सेल्सिअस असलं पाहिजे. हे तापमान मानवी शरीरासाठी योग्य आणि आरामदायक आहे. इतकंच नाही तर संशोधनानुसार एअर कंडिशनरमध्ये वाढलेल्या प्रत्येक डिग्री तापमानामुळे सुमारे सहा टक्के विजेची बचत होते. त्यामुळे वीज बिल कमी करण्यासाठी, एसीचं सरासरी तापमान 18 डिग्री सेल्सियसऐवजी 24 डिग्री सेल्सिअस ठेवा.