इस्लामाबाद, 8 ऑगस्ट : चीनला (China) पाकिस्तानकडून (Pakistan) लवकरच एक चांगली बातमी मिळू शकते. पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाने (Islamabad High Court) शनिवारी पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाकडून चिनी अॅप टिकटॉकवर (TikTok) लागू असलेल्या बंदीचा आढावा घेण्यास सांगितलं आहे. सरन्यायाधिश अतहर मिनल्लाह यांनी सांगितलं, की पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरण व्हिडीओ शेअरिंग अॅप ब्लॉक करण्याच्या निर्णयाचं समर्थन करण्यास अपयशी ठरलं आहे.
निर्णयात त्यांनी सांगितलं, की टिकटॉक अॅप गरिबांसाठी उत्पन्नाचं एक साधन आहे. न्यायालयाने दूरसंचार प्राधिकरणाला 23 ऑगस्ट रोजी न्यायालयात याबाबत एक रिपोर्ट सादर करण्यास सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दूरसंचार प्राधिकरणाने घोषणा केली होती, की त्यांनी वेबसाईटवर अश्लील कंटेंट अपलोड केल्या कारणाने देशात बाइटडान्स व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म बॅन करण्यात आला आहे. पाकिस्तान अश्लील कंटेंट हटवण्यास अपयशी ठरल्यानंतर पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाकडून चिनी अॅप टिकटॉक बॅन करण्यात आलं होतं.
पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाने एका ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक गुन्हेगारी प्रतिबंध कायदा 2016 च्या संबंधित तरतुदींनुसार, देशातील टिकटॉक अॅपवर बंदी घातली आहे.
याआधी पाकिस्तानमध्ये ऑक्टोबर 2020 मध्ये पहिल्यांदा टिकटॉकवर बॅन (TikTok Ban) लावण्यात आला होता. परंतु कंपनीकडून अश्लील कंटेंट पसरवणाऱ्या अकाउंट्सला ब्लॉक करण्याचं आश्वासन दिल्यानंतर 10 दिवसांनी हा बॅन हटवण्यात आला होता. टिकटॉककडून मागील तीन महिन्यात पाकिस्तानमध्ये टिकटॉकवरुन 60 लाखहून अधिक व्हिडीओ हटवण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news, Tiktok, Tiktok star, Tiktok viral video