मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /जगभरात चायनीज स्मार्टफोनचीच चलती! ॲपल-सॅमसंगपेक्षा Xiaomiची विक्री जास्त

जगभरात चायनीज स्मार्टफोनचीच चलती! ॲपल-सॅमसंगपेक्षा Xiaomiची विक्री जास्त

मार्केट रिसर्च करणाऱ्या काऊंटरपॉईंट (Counterpoint June Data) या संस्थेने ही माहिती जाहीर केली आहे.

मार्केट रिसर्च करणाऱ्या काऊंटरपॉईंट (Counterpoint June Data) या संस्थेने ही माहिती जाहीर केली आहे.

मार्केट रिसर्च करणाऱ्या काऊंटरपॉईंट (Counterpoint June Data) या संस्थेने ही माहिती जाहीर केली आहे.

  मुंबई, 6 ऑगस्ट-  चिनी मोबाईल कंपन्यांबाबत लोकांचे कसेही मत असले, तरी जगभरात सध्या त्यांचाच डंका वाजतोय हे खरं. मार्केट रिसर्च करणाऱ्या काऊंटरपॉईंट (Counterpoint June Data) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 2021च्या जूनमध्ये जगभरात शाओमी (Xiaomi June Sell) कंपनीच्या स्मार्टफोन्सची सर्वाधिक विक्री झाली. जगातील सर्वाधिक फोन्सची विक्री करणाऱ्या सॅमसंग आणि ॲपललाही शाओमीने (Xiaomi beats Samsung and Apple) मागे टाकलं आहे. या वर्षीच्या जूनमध्ये जगभरात झालेल्या एकूण स्मार्टफोन्स विक्रीमध्ये शाओमीचा (Xiaomi market share) वाटा 17.1 टक्के राहिला. त्यापाठोपाठ सॅमसंग (15.7 टक्के) आणि ॲपलचा (14.3 टक्के) नंबर लागला होता.

  दरम्यान, 2021 च्या पहिल्या क्वार्टरमध्ये एकूण विक्रीची टक्केवारी पाहता अजूनही सॅमसंगच पहिल्या क्रमांकावर असल्याचे काऊंटरपॉईंटने स्पष्ट (Samsung still tops in 2021) केले आहे. मात्र, जूनमध्ये शाओमीने मारलेली बाजी ही सॅमसंगसाठी एक इशारा आहे. केवळ स्मार्टफोनच्या विक्रीतच नाही, तर ओईएम (OEM) म्हणजेच ओरिजिनल इक्विपमेंट बनवण्यातही शाओमी पुढे आहे. जूनमध्ये शाओमीच्या ओईएममध्ये 26 टक्क्यांनी वाढ (Xiaomi OEM growth) झाल्याचे समोर आले आहे. सॅमसंगचे बरेचसे स्मार्टफोन्स हे व्हिएतनाममध्ये बनतात. या देशात कोविड-19 मुळे मोठ्या प्रमाणात लॉकडाउन लागू होते, ज्याचा फटका सॅमसंगला बसतोय. यासोबतच, शाओमीची प्रतिस्पर्धी असणाऱ्या हुवेई कंपनीवर अमेरिकेमध्ये निर्बंध (Huawei restrictions) लागू केले गेले आहेत. आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांसमोरील अशा अडचणींचा शाओमीला फायदा होताना दिसून येतोय.

  (हे वाचा: डार्क मोडमुळे स्मार्टफोनची Battery Life वाढते? संशोधकांनी केला मोठा खुलासा)

  काऊंटरपॉईंटचे रिसर्च डिरेक्टर तरुण पाठक (Tarun Pathak) म्हणाले, की हुवेई नसल्यामुळे मार्केटमध्ये निर्माण झालेली पोकळी भरुन काढण्यासाठी शाओमी मोठ्या प्रमाणात काम करत आहे. हुवेई आणि ऑनर या कंपन्यांचे चीन, युरोप, मिडल ईस्ट आणि आफ्रिकेतील ओईएम मार्केट (OEM Market) काबीज करण्याचा प्रयत्न शाओमी करताना दिसून येत आहे. चीन, युरोप आणि भारतातील कोविड-19 ची लाट ओसरण्याचा आणि सॅमसंगचे उत्पादन कमी झाल्याचा एकत्रित फायदा शाओमीला झाला आहे

  (हे वाचा:iPhone 13 असणार Made in China; आयफोनबाबत धक्कादायक खुलासा; काय आहे सत्य?  )

  यासोबतच, शाओमीच्या स्मार्टफोन्सचा सुधारलेला दर्जाही (Xiaomi Smartphones) त्यांची विक्री वाढण्यास कारणीभूत आहे. एमआय 11 सीरीजमधील स्मार्टफोन्स (Mi 11 Series) हे इतर कंपन्यांच्या प्रिमियम स्मार्टफोन्सच्या दर्जाचे आहेत. एमआय 11 अल्ट्रा (mi 11 Ultra) हा स्मार्टफोन सॅमसंगच्या एस आणि नोट सीरीजच्या स्मार्टफोन्सप्रमाणे असल्याचे यूझर्सनी म्हटले आहे. शाओमी सातत्याने नवनवीन आणि दर्जेदार स्मार्टफोन्स बाजारात आणत आहे. यामध्ये मिड रेंज, फ्लॅगशिप आणि प्रिमियम अशा सर्व रेंजमधील स्मार्टफोन मॉडेल्सचा समावेश आहे. कमी किंमतीत जास्त फीचर्स आणि चांगली क्वालिटी असं एकूण पॅकेज मिळत असल्यामुळे ग्राहकांचाही कल शाओमीच्या फोन्सकडे वाढला आहे असंही पाठक यांनी स्पष्ट केलं.

  First published:
  top videos

   Tags: Mobile Phone, Technology