जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / iPhone 13 असणार Made in China; आयफोनबाबत धक्कादायक खुलासा; काय आहे सत्य?

iPhone 13 असणार Made in China; आयफोनबाबत धक्कादायक खुलासा; काय आहे सत्य?

iPhone 13 असणार Made in China; आयफोनबाबत धक्कादायक खुलासा; काय आहे सत्य?

iPhone 13 साठी अ‍ॅपलने चिनी सप्लायर्सची मदत घेतल्याची बाब समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : Apple ची iPhone 13 सीरिज पुढील महिन्यात लाँच होणार आहे. कंपनी या सीरिजमध्ये iPhone 13, iPhone 13 Mini, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max हे स्मार्टफोन लाँच करणार आहे. iPhone 13 सीरिजबाबत अनेक लीक्स समोर आले आहेत. परंतु अ‍ॅपलने आयफोन 13 बाबत कोणताही खुलासा केलेल नाही. फोनमध्ये नेमकं काय नवं असेल याबाबतही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आता iPhone 13 साठी अ‍ॅपलने चिनी सप्लायर्सची मदत घेतल्याची बाब समोर आली आहे. Apple आपल्या iPhone 13 चं उत्पादन करण्यासाठी चिनी पुरवठादारांशी मिळून काम करत असल्याचं समोर आलं आहे. जपानच्या निक्केई वृत्तपत्रात दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेसोबतच्या व्यापारी युद्धातून उद्भवणाऱ्या तांत्रिक लढाईच्या रुपात बीजिंगला देशांतर्गत कंपन्या मजबूत करण्यासाठी प्रवृत करत असल्याचं, त्यात म्हटलं आहे.

iPhone घेण्याचा विचार आहे? इथे मिळतोय आतापर्यंतचा सर्वात मोठा Discount

वृत्तपत्राने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, लक्सशेयर प्रिसिजन इंडस्ट्री आता येणाऱ्या iPhone 13 सीरिजच्या 3 टक्क्यांपर्यंतची निर्मिती करण्यासाठी तयार आहे, अशी माहिती आहे. तसंच मागील वर्षी दोन कंपन्यांनी आयफोन उपकरणांसाठी की-कॉम्पोनेंट्स आणि पार्ट्स तयार केले असल्याचंही म्हटलं आहे.

पॉर्न पाहण्यात विवाहित स्त्रियांना अधिक रस, अभ्यासातून झाला कारणांचाही खुलासा

BOE Tech Group कॉम्पोनेंट्स तयार करेल, लेन्स टेक मेटल केसिंग आणि सनी ऑप्टिकल टेक ग्रुप रियर कॅमेरा लेन्सचा पुरवठा करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, याआधी चीपच्या तुटवड्यामुळे iphone च्या प्रोडक्शनवर परिणाम झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात