इलेक्ट्रिक वाहनांच्या जगात पैसे कमावण्याची जबरदस्त संधी; जाणून घ्या काय आहे फंडा

इलेक्ट्रिक वाहनांच्या जगात पैसे कमावण्याची जबरदस्त संधी; जाणून घ्या काय आहे फंडा

इलेक्ट्रिक कार मॅकेनिक, त्याच्या संबंधित व्यवसायाबद्दल माहिती कुठे मिळेल? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. एका स्टार्टअप DIYguru ने यासाठी एक ऑनलाईन कोर्स सुरू केला आहे. हा कोर्स घरबसल्या ऑनलाईन करता येऊ शकतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 मार्च : ऑटोमोबाईलनंतर आता इलेक्ट्रिक व्हिकलच्या (Electric Car Mechanic) जगात पावलं टाकली जात आहेत. केंद्रासह अनेक राज्य सरकारंही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी नवं-नव्या पॉलिसी आणत आहेत. यामुळे देशातील तरुणांनाही कमाईची चांगली संधी निर्माण होत आहे. याचा फायदा घेत, देशातील तरुण इलेक्ट्रिक वाहनांच्या नव्या जगात चांगल्या कमाईसाठी स्वत:ला तयार करू शकतात.

इलेक्ट्रिक कारच्या वाढत्या विक्रीसह आता याच्या मॅकेनिकचीही मागणी वाढते आहे. सध्या छोट्या-छोट्या जागांवरही पेट्रोल-डिझेल वाहनांसाठी मॅकेनिक सहजपणे मिळतात. परंतु इलेक्ट्रिक वाहनांच्या मॅकेनिकची संख्या शून्य आहे. मोठ्या कंपन्यांनाही इलेक्ट्रिक कारसाठी मॅकेनिक मिळत नसल्याचं चित्र आहे.

याचाच फायदा घेता येऊ शकतो. इलेक्ट्रिक गाड्यांचे मॅकेनिक बनून चांगली कमाई करता येऊ शकते. इलेक्ट्रिक कार मॅकेनिक, इलेक्ट्रिक कार वर्कशॉप किंवा इलेक्ट्रिक वाहनांच्या पार्ट्सशी संबंधित व्यवसाय करता येऊ शकतो.

(वाचा - 4 लाख रुपये बजेटमध्ये खरेदी करू शकता या जबरदस्त कार; आकर्षक फीचर्स, किंमतही कमी)

ऑनलाईन ट्रेनिंग (Electric Car Mechanic) -

इलेक्ट्रिक कार मॅकेनिक, त्याच्या संबंधित व्यवसायाबद्दल माहिती कुठे मिळेल? असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. एका स्टार्टअप DIYguru ने यासाठी एक ऑनलाईन कोर्स सुरू केला आहे. हा कोर्स घरबसल्या ऑनलाईन करता येऊ शकतो. या कोर्समध्ये इलेक्ट्रिक गाड्यांशी संबंधित माहिती दिली जाईल. या कोर्समध्ये वर्कशॉपसह प्रॅक्टिकल माहितीही दिली जाईल.

(वाचा - गाडीला FASTag नसेल,तर वाहनाचा इन्शोरन्सही होणार नाही,लागू होणार ही नवी व्यवस्था)

DIYguru एक टेक कंपनी आहे, जी इलेक्ट्रिक मॉबिलिटी वर्कफोर्सला स्किल्स देते. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लोकांना इलेक्ट्रिक गाड्यांचं ट्रेनिंग दिलं जातं आहे. DIYguru कोर्सचा फायदा Bosch, Hyundai, Maruti सारख्या कंपन्याही घेत आहेत आणि आपल्या वर्कर्सला ट्रेनिंग देत आहेत. DIYguru च्या वेबसाईटवर कोर्ससाठी 56 हजारहून अधिक लोकांनी रजिस्टर केलं आहे.

(वाचा - वाहनांवर स्क्रॅपिंग पॉलिसीचे सर्वसामान्यांना होणार हे 5 मोठे फायदे; पाहा डिटेल्स)

कंपनीचे फाउंडर अविनाश सिंह यांनी सांगितलं की, हा ऑनलाईन कोर्स खासप्रकारे डिझाईन करण्यात आला आहे. तसंच याची फीदेखील कमी आहे. कोर्ससह विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेजसाठी वर्कशॉपही घेतलं जातं.

मान्यताप्राप्त कोर्स -

माय गव्हर्नमेंटच्या Digital India Foundation Award ने सन्मानित DIYguru चा पाया तीन तरुण अविनाश कुमार सिंह, जसकरन सिंह मनोचा आणि आकाश जैन यांनी 2017 मध्ये घातला. कंपनीचा उद्देश ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून देशात इलेक्ट्रिक कारसाठी जाणकार, विशेषज्ञ आणि मॅकेनिक तयार करणं हा आहे. याची मागणी भविष्यकाळात वाढणार आहे. DIYguru च्या कोर्सेसला शिक्षण मंत्रालयासह अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनेही मान्यता दिली आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: March 13, 2021, 4:23 PM IST

ताज्या बातम्या