मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

लॉकडाउनमध्ये Car बंद असताना असा ठेवा मेंटेनन्स, Ford कंपनीनं दिल्या महत्त्वाच्या टिप्स

लॉकडाउनमध्ये Car बंद असताना असा ठेवा मेंटेनन्स, Ford कंपनीनं दिल्या महत्त्वाच्या टिप्स

नवी दिल्ली, 9 जून : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर सुरू असलेलं लॉकडाउन (Lockdown) आणि घरुन काम करण्याच्या नव्या पध्दतीमुळे कार (Car) रस्त्यावर कमी प्रमाणात धावत असून पार्किंगमध्येच (Parking) जास्त काळ आहेत. दीर्घकाळ बंद राहिल्याने कार्समध्ये काही तक्रारी उद्भवतात. ऐनवेळी मग धावपळ करावी लागते. यासाठी कार बंद असताना तिची काळजी कशी घ्यावी याबाबत फोर्ड कार कंपनीनं काही सूचना दिल्या आहेत. यामुळे तुमच्याकडे फोर्ड कार असेल तर ती सुरक्षित राहीलच, पण इतर कारसाठीही या सूचना उपयुक्त ठरू शकतात.

शेडमध्ये कार पार्क करा किंवा कार कव्हरचा वापर करा -

जेव्हा कार खूप काळ बंद राहणार असेल, तेव्हा ती सुरक्षित आणि स्वच्छ राहावी यासाठी कार शेडमध्ये (Car Shed) पार्क करा. शेड नसेल, तर कारसाठी चांगल्या दर्जाचं कव्हर (Cover) खरेदी करा. यामुळे कारची बॉडी गंजणार नाही, तसंच तिच्या रंगावरही परिणाम होणार नाही. कार शेडमध्ये पार्क केली असेल, तर दमट हवामानात आर्द्रतेचे बाष्पीभवन लवकर होण्यासाठी कारला कव्हर घालण्याची गरज नाही.

टायरमधील हवा चेक करा -

रस्त्यावर कार उत्तमरीतीने धावावी यासाठी कारच्या टायर्समध्ये (Tyers) हवा व्यवस्थित असणं आवश्यक आहे. कार दिर्घकाळ उभीच असेल, तर टायरमधील हवेचा दाब (Air Pressure) कमी होतो. त्यामुळे लॉकडाउनदरम्यान कारच्या चाकांमधील हवेचा दाब नियमित चेक करणं आवश्यक आहे. तसंच व्हॉल्व आणि व्हॉल्व कॅप लीक नाहीत ना, हेदेखील तपासलणं गरजेचं आहे.

हँडब्रेक लावू नये, कार गिअरमध्ये पार्क करावी -

जेव्हा वाहन दिर्घकाळासाठी पार्क करायचं असेल, तेव्हा समतल जागी पार्क करावे. हँडब्रेक (Hand Break) लावू नये. कारण यामुळे ब्रेक पॅड आणि डिस्क-ड्रममध्ये गंज लागू शकतो आणि ते जाम होऊ शकतात. त्यामुळे गाडी पहिल्या गिअरमध्ये असावी, तसंच ती सरकू नये यासाठी व्हिल चोकचा (Wheel Chock) वापर करावा.

तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? सोप्या ट्रिकद्वारे असं तपासा

इंधन टाकी भरुन घ्यावी -

कार दिर्घकाळ एकाच जागी उभी असेल, तर फ्युएल टॅंकमध्ये (Fuel Tank) मोठी समस्या निर्माण होऊ शकते आणि त्याला गंज चढू शकतो. इंधन कमी असेल, तर इंधन पंपावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो आणि तो लवकर खराब होऊ शकतो. इंधन कमी असल्यास रिकाम्या टॅंकमध्ये कंडेन्सेशन होऊ शकतं आणि त्याला गंज चढू शकतो. त्यामुळे कारची टाकी चांगल्या दर्जाच्या इंधनाने फुल करावी आणि टॅंक पूर्णतः सील राहिल याची काळजी घ्यावी.

बॅटरी डिस्कनेक्ट करावी -

कारचा दिर्घकाळ वापर होणार, नसेल तर बॅटरी (Battery) काढून ठेवणं चांगलं. टर्मिनल्स आणि तारांवर ग्रीस लावून ठेवल्यास त्यावर गंज चढणार नाही. तसंच दर 4 ते 5 दिवसांनी कार स्टार्ट करावी आणि काही वेळ सुरुच ठेवावी. जेणेकरुन बॅटरी सामान्यपणे कार्यरत राहिल.

WhatsAppमध्ये End-to-end encryption नेमकं आहे तरी काय?जाणून घ्या हे कसं काम करतं

नियमित कालावधीनंतर इंजिन ऑईल बदलावं -

कारचं आयुष्य हे मुख्यतः इंजिन ऑईलची (Engine Oil) गुणवत्ता आणि इंटीग्रिटीवर अवलंबून असतं. इंजिन ऑईलमुळे कारमधील सर्व फिरणारे भाग ल्युब्रिकेटेड राहतात आणि त्यावरील धूळ, घाण निघून जात नुकसान कमी होते.

जगभरात या Emoji ला सर्वाधिक पसंती, तुम्हीही हा इमोजी वापरता का?

इंटेरिअर स्वच्छ ठेवावं -

एक्सटेरिअरसह कारमधील इंटेरिअरदेखील (Interior) स्वच्छ ठेवणं महत्वाचं आहे. यासाठी दर 4 ते 5 दिवसांनी कार स्टार्ट करावी, तसंच एसी किंवा एअरब्लोअर स्टार्ट करावा. यामुळे केबिनमधील धुलिकण निघून जातात. कारमध्ये कोणताही खाद्यपदार्थ ठेवू नये, तसंच कारच्या सर्व खिडक्या पूर्ण बंद राहतील याकडे लक्ष द्यावं. फोर्ड पास अॅपद्वारे ग्राहकांना वाहनाचं आरोग्य तसंच स्टार्ट / स्टॉप, लॉक/ अनलॉकसारखे रिमोट फीचर्स (Remote Feature) देखील तपासता येऊ शकतात. तसंच आपलं वाहनही लोकेट करता येऊ शकतं.

First published:

Tags: Car