मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

सायबर अटॅकपासून वाचवेल Google Chrome चं हे प्रायव्हसी फीचर; जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

सायबर अटॅकपासून वाचवेल Google Chrome चं हे प्रायव्हसी फीचर; जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

क्रोम ब्राउजरचं हे नवं अपडेट अनेक प्रकारच्या प्रोटेक्शन फीचरसह आलं आहे. तुमच्या सेव्ह केलेल्या पासवर्डपैकी एखादा कमकुवत पासवर्ड असेल, तर गुगल क्रोम त्याला आयडेंटिफाय करुन तो युजरला बदलण्यासाठी सांगेल.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 21 मार्च : गुगलने (Google)आपल्या क्रोम (Chrome) ब्राउजरसाठी एक नवं प्रायव्हसी फीचर रोल आउट केलं आहे. हे फीचर गुगल क्रोमच्या लेटेस्ट वर्जन v88 सह रोल आउट करण्यात आलं आहे. क्रोम ब्राउजरचं हे नवं अपडेट अनेक प्रकारच्या प्रोटेक्शन फीचरसह आलं आहे. तुमच्या सेव्ह केलेल्या पासवर्डपैकी एखादा कमकुवत पासवर्ड असेल, तर गुगल क्रोम त्याला आयडेंटिफाय करुन तो युजरला बदलण्यासाठी सांगेल.

सेव्ह केलेला पासवर्ड चेक करण्यासाठी ब्राउजरच्या अॅड्रेस बारमध्ये जाऊन ‘chrome://settings/passwords’ टाईप करावं लागेल. त्यानंतर तुमचे सर्व सेव्ह केलेले पासवर्ड एनक्रिप्टेड फॉर्ममध्ये दिसतील. ‘Check Now’ वर क्लिक केल्यानंतर पासवर्ड चेक होईल आणि पासवर्ड अतिशय कमकुवत असल्यास तो बदलण्यासाठी सांगितलं जाईल. अशाप्रकारे तुमचा कमकुवत पासवर्ड बदलून सायबर अटॅकपासून बचाव करता येऊ शकतं.

गुगलने आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये सांगितलं की, अनेकदा असं होतं की, नवीन लॉग-इन सेटअप करताना घाईत आपण एखादा सोपा पासवर्ड सिलेक्ट करतो. कमजोर-कमकुवत पासवर्डमुळे सायबर अटॅकचा मोठा धोका निर्माण होतो. त्यामुळे Chrome 88 मध्ये असे कमकुवत पासवर्ड चेक करणं युजर्ससाठी फायद्याचं ठरु शकतं.

(वाचा - Logout करायचं विसरलात? असं जाणून घ्या किती सिस्टममध्ये आजही ओपन आहे तुमचं Gmail)

क्रोमच्या नव्या अपडेटद्वारे युजर्स मल्टीपल युजरनेम आणि पासवर्डला एकत्र चेक करु शकतो. सध्या हे फीचर गुगल क्रोमच्या डेस्कटॉप आणि iOS वर्जनसाठी रोल आउट करण्यात आलं आहे. Android युजर्सला यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते.

chrome कसं कराल अपडेट?

- डेस्कटॉप युजर्सला सर्वात आधी Google Chrome रन करावं लागेल. ब्राउजर ओपन झाल्यानंतर उजव्या बाजूला अॅड्रेस बारजवळ तीन डॉटवर क्लिक करावं लागेल.

- त्यानंतर खाली स्क्रोल करुन सेटिंग्ज ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर डाव्या बाजूला अनेक पर्याय दिसतील.

- त्यापैकी Safety Check वर क्लिक करा.

(वाचा - आता ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी लागू होणार नवे नियम; जाणून घ्या काय होणार बदल)

- Safety Check वर क्लिक केल्यानंतर, सर्वात वर Check Now हे ब्लू बटण दिसेल. त्यावर क्लिक करुन गुगल क्रोम लेटेस्ट अपडेट चेक करु लागेल. जर तुमचं ब्राउजर लेटेस्ट अपडेटसह अपडेटेड आहे, तर अपडेटसाठी प्राम्ट केलं जाणार नाही. अपडेट नसेल, तर अपडेटवर क्लिक करुन लेटेस्ट अपडेट डाउनलोड करता येईल. अशाप्रकारे Google Chrome v88 वर्जनसह अपडेट होईल आणि अॅडिशन सिक्योरिटीही मिळेल.

या प्रायव्हसी आणि पासवर्ड प्रोटेक्शन फीचरमुळे 37 टक्क्यापर्यंत क्रेडेंशियल्स चोरी होण्याच्या घटनांमध्ये कमी होऊ शकते, असं गुगलकडून सांगण्यात आलं आहे.

First published:

Tags: Google, Password, Tech news