जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / जगातला पहिला 18GB रॅम असणारा स्मार्टफोन लाँच; पाहा किती आहे किंमत

जगातला पहिला 18GB रॅम असणारा स्मार्टफोन लाँच; पाहा किती आहे किंमत

जगातला पहिला 18GB रॅम असणारा स्मार्टफोन लाँच; पाहा किती आहे किंमत

Red Magic 6 Pro जगातील पहिला स्मार्टफोन ठरला आहे, ज्याने 18GB रॅम दिला आहे. नूबियाने टेंसेंट गेम्सच्या भागीदारीमध्ये गेमिंग स्मार्टफोन्स Red Magic 6 आणि Red Magic 6 Pro चं टेंसेंट एडिशन लाँच केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 6 मार्च : Nubia ने Tencent गेम्ससह मिळून 18 GB रॅम असणारा स्मार्टफोन लाँच केला आहे. Red Magic 6 Pro जगातील पहिला स्मार्टफोन ठरला आहे, ज्याने 18GB रॅम दिला आहे. नूबियाने टेंसेंट गेम्सच्या भागीदारीमध्ये गेमिंग स्मार्टफोन्स Red Magic 6 आणि Red Magic 6 Pro चं टेंसेंट एडिशन चीनमध्ये लाँच केलं आहे. या दोन्ही स्मार्टफोनपैकी केवळ Red Magic 6 Pro ला 18GB रॅम देण्यात आला आहे. काय आहेत फीचर्स - 165Hz डिस्प्ले क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर 120W पर्यंत फास्ट चार्जिंग AMOLED डिस्प्ले CPHY-DSI टेक्नोलॉजी, जी हाय क्वालिटी इमेजेजसाठी ट्रान्समिशन रेट वाढवते.

News18

गेमर्सला या स्मार्टफोनने फास्ट गेमिंगचा अनुभव करता येईल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. Red Magic 6 ची सुरुवातीची किंमत जवळपास 42,700 रुपये इतकी आहे. तर Red Magic 6 Pro ची सुरुवातीची किंमत 49,568 रुपये इतकी आहे. तसंच Red Magic 6 Pro च्या 18GB + 512GB वेरिएंटची किंमत 74, 200 रुपये आहे.

(वाचा -  1 एप्रिलपासून कारममध्ये हे फीचर नसल्यास येईल समस्या, जाणून घ्या सरकारचा नवा नियम )

RedMagic 6 सीरीज स्मार्टफोनमध्ये नवा ICE 6.0 मल्टी डायमेंशनल कूलिंग सिस्टम आणि इनबिल्ट टर्बोफॅन देण्यात आला आहे. तसंच यात 400Hz Dual Pro शोल्डर ट्रिगर्सही देण्यात आले आहेत. फोटोसाठी दोन्ही स्मार्टफोनच्या रियरमध्ये 64 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसंच प्रो वेरिएंटमध्ये 120W फास्ट चार्जिंगसह 4500mAh बॅटरी आणि रेग्लुलर वेरिएंटमध्ये 5050mAh बॅटरीसह 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात