नवी दिल्ली, 3 जून : सोशल मीडिया अकाउंट (Social Media Account) हॅक (Hacking) होणं, त्याचं क्लोनिंग होण (cloning) असे अनेक प्रकार वारंवार ऐकायला मिळतात. अशात ट्विटर (Twitter), फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्राम (Instagram) सुरक्षित ठेवणं मोठं चॅलेंजिंग ठरतं. परंतु काही स्टेप्स फॉलो करुन तुमचं सोशल मीडिया प्रोफाईल हॅक होण्यापासून वाचवता येऊ शकतं.
Facebook च्या सेक्युरिटी अँड लॉगइन पेजवर चेक करत राहा, की तुमच्या डिव्हाईसशिवाय फेसबुक इतर ठिकाणी log in दिसत नाही ना. जर असं दिसत असेल, तर 'Log out all device' मधून लॉग आउट करा. जर तुम्ही एखाद्या वेबसाईटला फेसबुकशी लॉगइन केलं असेल, तर ते त्वरित हटवा.
फेसबुकच्या सुरक्षेसाठी मजबूत पासवर्ड (Strong Password) असणं गरजेचं आहे. अनोळखी ठिकाणी सायबर कॅफे (Cyber Cafe) किंवा कोणत्याही इतर ठिकाणी डिव्हाईसमध्ये फेसबुक ओपन करू नका. तसंच लॉगइनसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करा.
Twitter सिक्योर करण्यासाठी सर्वात आधी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (Two-factor authentication) Turn On करणं गरजेचं आहे. यामुळे अकाउंटला सुरक्षित लेअर मिळते. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन केल्यानंतर अकाउंट लॉगइन (Twitter Login) करण्याचा कोणी प्रयत्न केल्यास फोनवर एक कोड येईल.
तुमच्या अकाउंटच्या डायरेक्ट मेसेजला (Direct Message) डिसऐबल करा, असं केल्यानंतरही तुमचं अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी मदत होईल.
Instagram वरही टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन नेहमी Enable ठेवा. यामुळे कधीही तुमचं अकाउंट कोणत्याही डिव्हाईसमध्ये लॉगइन कराल, त्या प्रत्येकवेळी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल. विना ओटीपी तुमचं अकाउंट लॉगइन (Login) होणार नाही. नेहमी अॅपद्वारे इन्स्टाग्राम लॉगइन करा, कोणत्याही लिंकवरुन लॉगइन करू नका.
हॅकर्स एक असं Phishing पेज तयार करतात, जे हुबेहुब इन्स्टाग्राम पेजप्रमाणे दिसतं. तुम्ही जसं या फेक पेजवर लॉगइन कराल, तसा तुमचा पासवर्ड आणि युजर नेम हॅकर्सकडे जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.