मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

नको असलेल्या कॉल्स आणि SMS मुळे वैताग आलाय? फोनमध्ये असा अ‍ॅक्टिव्हेट करा DND मोड

नको असलेल्या कॉल्स आणि SMS मुळे वैताग आलाय? फोनमध्ये असा अ‍ॅक्टिव्हेट करा DND मोड

नको असलेल्या फोन आणि SMS पासून सुटका करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना DND मोड अ‍ॅक्टिव्हेट करण्याची सुविधा देतात. डू नॉट डिस्डर्ब अर्थात DND (Do Not Disturb) सर्विस अ‍ॅक्टिव्हेट केल्यानंतर मार्केटिंग कॉल्स येणं बंद होईल.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 10 एप्रिल : तुम्हीही मार्केटिंग आणि जाहिरात कंपन्यांकडून येणाऱ्या सततच्या नको असलेल्या फोन आणि एसएमएसमुळे वैताग आला आहे का? नको असलेल्या फोन आणि SMS पासून सुटका करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना DND मोड अ‍ॅक्टिव्हेट करण्याची सुविधा देतात. डू नॉट डिस्डर्ब अर्थात DND (Do Not Disturb) सर्विस अ‍ॅक्टिव्हेट केल्यानंतर मार्केटिंग कॉल्स येणं बंद होईल.

Vodafone-Idea युजर्स कसा अ‍ॅक्टिव्हेट कराल DND मोड -

- वोडाफोन-आयडियाची डीएनडी सर्विस सुरू करण्यासाठी https://www.myvi.in/dnd या लिंकवर जावं लागेल.

- त्यानंतर वोडाफोन-आयडिया युजर्स त्यांचा नंबर टाईप करुन Get OTP वर क्लिक करा.

- ओटीपी टाकल्यानंतर डीएनडी सेटिंग्स येईल.

- येथून डीएनडी मोड अ‍ॅक्टिव्हेट किंवा डि-अ‍ॅक्टिव्हेट करता येईल.

(वाचा - तुमच्या गैरहजेरीत तुमचा फोन कोणी वापरला? क्षणात असा लावा शोध)

Airtel युजर्स -

- यासाठी एअरटेल वेबसाईट www.airtel.in वर जाऊन DND पेजवर जा.

- किंवा थेट https://www.airtel.in/airtel-dnd/ या लिंकवरही जाऊ शकता.

- एअरटेल मोबाईल सर्विस सेक्शनमध्ये Click Here ऑप्शनवर क्लिक करा.

- तुमचा एअरटेल नंबर टाका आणि Get OTP वर क्लिक करा.

- OTP टाकल्यानंतर end all ऑप्शनवर क्लिक करा.

(वाचा- ड्रायव्हिंग टेस्टवेळी या चुकीमुळे 31 टक्के लोक होतात फेल, या गोष्टीकडे द्या लक्ष)

Reliance Jio युजर्स -

- फोनमध्ये MyJio अ‍ॅप डाउनलोड करुन लॉगइन करा.

- आता Settings मध्ये जा.

- येथे DND हा पर्याय दिसेल.

- त्यानंतर कंपनी एक लेटर देईल आणि DND मोड 7 दिवसांमध्ये अ‍ॅक्टिव्हेट होईल.

First published:

Tags: Airtel, Reliance Jio, Tech news, Vodafone services