मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /ड्रायव्हिंग टेस्टवेळी 'या' एका चुकीमुळे 31 टक्के लोक होतात फेल, या गोष्टीकडे द्या विशेष लक्ष

ड्रायव्हिंग टेस्टवेळी 'या' एका चुकीमुळे 31 टक्के लोक होतात फेल, या गोष्टीकडे द्या विशेष लक्ष

टेस्टसाठी अनेक लोक वाहन चालवताना सर्व सावधगिरी बाळगतात, परंतु एका चुकीमुळे ते टेस्टमध्ये फेल होतात आणि ड्रायव्हिंग लायसन्स दिलं जात नाही. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (Ministry of Road Transport and Highways) अहवालात हा खुलासा झाला आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 10 एप्रिल : ड्रायव्हिंग लायसन्स (Driving licence) मिळवण्यासाठी आरटीओमध्ये, आरटीओच्या (RTO) नियमांनुसार वाहन चालवून दाखवावं लागतं. या टेस्टमध्ये पास झाल्यानंतरच ड्रायव्हिंग लायसन्स दिलं जातं. टेस्टसाठी अनेक लोक वाहन चालवताना सर्व सावधगिरी बाळगतात, परंतु एका चुकीमुळे ते टेस्टमध्ये फेल होतात आणि ड्रायव्हिंग लायसन्स दिलं जात नाही. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (Ministry of Road Transport and Highways) अहवालात हा खुलासा झाला आहे.

सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी काही नवे नियम लागू (New Rules for DL) केले आहेत. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करताना आता आणखी एका ऑनलाईन अर्जाची गरज लागणार आहे. सरकार राज्यातील आरटीओची संख्याही वाढवत आहे. तसंच लायसन्स मिळवण्यासाठी टेस्टमध्ये अनेक नवे पॅरामीटरही जोडण्यात येत आहेत.

या कारणामुळे टेस्टमध्ये होतात फेल -

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाद्वारा, देशभरातील आरटीओतून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी देण्यात येणाऱ्या टेस्टमध्ये अनेक जण फेल होण्यामागे एक कारण समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चारचाकी वाहनांच्या टेस्टिंगदरम्यान 31 टक्के लोक वाहनाला रिवर्स करण्याची चूक करतात. म्हणजे वाहन चालवताना चालक डाव्या-उजव्या बाजूला वाहनाला वळवतात, परंतु वाहनाला रिवर्स करताना त्यात चूक करतात. चुकीच्या पद्धतीने वाहन रिवर्स करणाऱ्यांचं प्रमाणं 31 टक्के असल्याची माहिती समोर आली आहे.

(वाचा - Driving Licence काढण्याच्या नियमांमध्ये बदल; केवळ याच पद्धतीने अर्ज करता येणार)

कसे असणार नवे नियम -

काही दिवसांपूर्वी सभागृहात ड्रायव्हिंगबाबतचे नवे नियम आणि ड्रायव्हिंग परीक्षा पास होण्याच्या टक्क्यांबाबत दिलेल्या एका लेखी उत्तरात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं की, ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी अर्जदाराला कमीत-कमी 69 टक्के गुण मिळवणं गरजेचं आहे, त्यानंतरच अर्जदार पुढील टेस्टसाठी पात्र होईल. तसंच मर्यादित अंतरावर गाडी डावीकडे-उजवीकडे रिवर्स करणं आणि योग्यरित्या चालवणंही अनिवार्य असणार आहे.

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणाऱ्याला, टेस्ट देण्यापूर्वी एक व्हिडीओ लिंक दाखवली जाईल, ज्यात ड्रायव्हिंग टेस्टबाबत संपूर्ण माहिती असेल. त्याशिवाय ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकवर LED स्क्रिनच्या माध्यमातून टेस्टचा डेमो अर्जदाराला दाखवला जाईल.

First published:

Tags: Driving license, While driving