Home /News /technology /

WhatsApp ओपन न करताच समजेल कोण ऑनलाईन आहे; जाणून घ्या ही सोपी ट्रिक

WhatsApp ओपन न करताच समजेल कोण ऑनलाईन आहे; जाणून घ्या ही सोपी ट्रिक

अकाउंट डिलीट केल्यानंतर पुन्हा सक्रीय होणार नाही

अकाउंट डिलीट केल्यानंतर पुन्हा सक्रीय होणार नाही

एक अशी ट्रिक आहे, ज्याद्वारे तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये कोण-कोण ऑनलाईन आहे, अ‍ॅक्टिव्ह आहे याची माहिती whatsapp ओपन न करताच मिळू शकते.

  नवी दिल्ली, 5 एप्रिल : मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp सर्वाधिक वापरलं जाणारं अ‍ॅप आहे. अनेकदा कोण-कोण ऑनलाईन आहे हे पाहण्यासाठी त्या व्यक्तीचं चॅट ओपन करावं लागतं. यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ओपन करावं लागतं, त्यानंतरच कोण ऑनलाईन आहे याची माहिती मिळते. परंतु एक अशी ट्रिक आहे, ज्याद्वारे तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये कोण-कोण ऑनलाईन आहे, अ‍ॅक्टिव्ह आहे याची माहिती whatsapp ओपन न करताच मिळू शकते. GBWhatsApp - GBWhatsApp याद्वारे तुम्ही ऑनलाईन न येताच, तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये कोण अ‍ॅक्टिव्ह आहे, याची माहिती मिळू शकते. यासाठी सर्वात आधी गुगलवर GBWhatsApp सर्च करावं लागेल. त्यानंतर लिंकवरुन याची एपीके फाईल डाउनलोड करावी लागेल. नंतर एपीके फाईलवरुन GBWhatsApp अ‍ॅप फोनमध्ये इन्स्टॉल करावं लागेल.

  (वाचा - WhatsApp डिलीट करायचंय पण डेटा गमावण्याची भीती?या पद्धतीने सुरक्षित ठेवा माहिती)

  ऑनलाईन येताच मिळेल नोटिफिकेशन - GBWhatsApp अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर सेटिंग्जमध्ये जाऊन Main/Chat screen चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर Contact Online Toast हा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करुन, ज्या कॉन्टॅक्टचं ऑनलाईन स्टेटस पाहायचं असेल, तो कॉन्टॅक्ट निवडा. ज्यावेळी हा कॉन्टॅक्ट ऑनलाईन येईल, त्यावेळी याबाबत नोटिफिकेशन मिळेल.

  (वाचा - सावधान! एका चुकीमुळे होऊ शकतो अँड्रॉईड फोनमधला संपूर्ण डेटा चोरी)

  दरम्यान, हे थर्ड पार्टी अ‍ॅप आहे, त्यामुळे एखाद्याचं ऑनलाईन स्टेटस, तुम्ही ऑनलाईन न येताच किंवा व्हॉट्सअ‍ॅप ओपन न करताच पाहायचं असल्याचं स्वत:च्या रिस्कवरच हे अ‍ॅप डाउनलोड करा.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Whatsapp, WhatsApp chats

  पुढील बातम्या