• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Safety Tips : या चुकांमुळे होऊ शकतो Smartphone ब्लास्ट; अशी घ्या काळजी

Safety Tips : या चुकांमुळे होऊ शकतो Smartphone ब्लास्ट; अशी घ्या काळजी

स्मार्टफोनच्या ब्लास्टिंगसाठी अनेक कारणं असू शकतात. यासाठी युजर्सनेही काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं

 • Share this:
  नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : अनेकदा स्मार्टफोन ब्लास्ट झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. मागच्या काही दिवसांमध्ये OnePlus Nord 2 या स्मार्टफोनमध्ये ब्लास्ट झाला होता. OnePlus च्या या मॉडेलमध्ये बॅटरीत स्फोट झाल्याच्या तक्रारी युजर्सकडून (how to avoid phone blast) करण्यात आल्या होत्या. यासाठी स्मार्टफोनचा चुकीच्या वापरालादेखील जबाबदार धरण्यात आलं होतं. परंतु स्मार्टफोनच्या ब्लास्टिंगसाठी (Smartphone blast reasons) अनेक कारणं असू शकतात. यासाठी युजर्सनेही काही गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं गरजेपेक्षा जास्त चार्जिंग करणं - अनेकदा ब्लास्टिंगसाठी कंपनीच्या Poor क्वॉलिटीला जबाबदार धरलं जातं. परंतु प्रत्येकवेळी तसंच होत नाही. अनेकजण रात्री झोपताना स्मार्टफोन (phone blast while charging) चार्जिंगला लावून झोपतात. त्यामुळे ओवरचार्जिंग आणि त्यातून ओवरहिटिंगची समस्या उद्भवते. त्यामुळे बॅटरी फुगून स्मार्टफोन ब्लास्ट होण्याचा धोका असतो.

  Fraud Alert! तुम्हालाही आलाय का Free Laptop मिळणारा मेसेज? लगेच करा डिलीट

  दुसऱ्या चार्जरचा वापर - स्मार्टफोनला चार्ज करताना त्याला कंपनीकडून देण्यात आलेल्या चार्जरनेच चार्ज करायला हवं. त्यासंदर्भात स्मार्टफोन कंपन्याही अनेकदा सूचना जारी करत असतात. कारण स्मार्टफोनला इतर चार्जरने चार्ज केल्यास त्याची बॅटरी गरम होते आणि Internal Components ला ही धोका निर्माण होतो. त्यामुळे दुसऱ्या चार्जरने स्मार्टफोन चार्ज करणं हे ब्लास्टिंगसाठी प्रमुख कारण ठरण्याची शक्यता असते.

  बाबो! तब्बल 64 लाख रुपयांत झाली या iPhone ची विक्री, कारण ऐकून हैराण व्हाल

  स्मार्टफोनची बॅटरी डॅमेज होणं - तज्ञांच्या मते, बॅटरी कोणत्या स्थितीत आहे हे यावरही स्मार्टफोनचं आयुष्य ठरलेलं असतं. अनेकदा युजर्सकडून फोन पडल्यामुळे किंवा आदळल्यामुळं त्याची बॅटरी खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळं ब्लास्टिंगची समस्या निर्माण होते.

  Aadhaar Card हरवलंय?मोबाइल नंबर लिंक नसेल, तरी असं करा डाउनलोड;पाहा सोपी प्रोसेस

  प्रोसेसर Overload असणं - स्मार्टफोनमध्ये Multi-Tasking काम करणं आणि अतिप्रमाणात गेम्स खेळणं हे देखील स्मार्टफोनमध्ये ओवरहिटिंगची समस्या वाढवतात. त्यामुळे स्मार्टफोनचा वापर करत असताना त्याला जास्त गरम होऊ देऊ नये. योग्य प्रमाणात त्याचा वापर करावा.

  अस्वच्छ Headphoneअसे करा क्लिन,चांगल्या परफॉर्मेन्ससाठी जाणून घ्या Cleaning Tips

  पाणी आणि उन्हापासून राहा सावध - जर स्मार्टफोनची बॅटरी पाणी किंवा उन्हाच्या संपर्कात आली तर त्यावेळी ब्लास्टिंगची समस्या निर्माण होऊ शकते. कारण बॅटरी जास्त तापल्यामुळं ती फुगते आणि त्यातून स्मार्टफोन ब्लास्ट होतो.
  Published by:Atik Shaikh
  First published: