मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Aadhaar Card हरवलंय? मोबाइल नंबर लिंक नसेल, तरीही असं करा डाउनलोड; पाहा सोपी प्रोसेस

Aadhaar Card हरवलंय? मोबाइल नंबर लिंक नसेल, तरीही असं करा डाउनलोड; पाहा सोपी प्रोसेस

आधार कार्ड हरवलं असेल आणि मोबाइल नंबर लिंक नसेल तरीही आता सहजरित्या Aadhaar Card मिळवता येतं.

आधार कार्ड हरवलं असेल आणि मोबाइल नंबर लिंक नसेल तरीही आता सहजरित्या Aadhaar Card मिळवता येतं.

आधार कार्ड हरवलं असेल आणि मोबाइल नंबर लिंक नसेल तरीही आता सहजरित्या Aadhaar Card मिळवता येतं.

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : भारतातील नागरिकांसाठी आधार कार्ड हे एक महत्त्वाचं डॉक्यूमेंट आहे. आधार कार्डचा वापर सरकारी कामांसह खासगी कामांसाठीही केला जातो. अतिशय महत्त्वाचं असलेलं हे आधार कार्ड हरवलं किंवा फाटलं तर मोठी समस्या येऊ शकते.

अनेक लोकांच्या Aadhaar Card हरवल्याच्या तक्रारी असतात. पण ते पुन्हा कसं मिळवायचं याबाबत लोकांना माहिती नसते. आधार कार्ड पुन्हा मिळवण्यासाठी त्याला Mobile Number लिंक असायलाच हवा असं नाही. ज्या लोकांनी आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक केलेला नसेल त्या लोकांनाही आता सहजरित्या Aadhaar Card मिळवता येतं.

Driving License हरवलं? घरबसल्या असं बनवा डुप्लीकेट; पाहा संपूर्ण प्रोसेस

मोबाइल नंबरशिवाय असं डाउनलोड करा आधार कार्ड -

सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच https://uidai.gov.in/ वर लॉगइन करा. त्यानंतर होमपेजवरील My Aadhaar च्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Order Aadhaar Reprint ला सेलेक्ट करा. त्यानंतर तुमचा 12 अंकी आधार नंबर एन्टर करून Security Code टाका. जर तुमचा मोबाइल नंबर आधारशी लिंक नसेल, तर त्यासाठी Check Box च्या ऑप्शनवर क्लिक (get aadhaar card without mobile number) करून त्यावर तुमचा चालू मोबाईल नंबर टाका.

आता Offline करु शकता Aadhar Verification, वाचा संपूर्ण प्रोसेस

तुमच्या मोबाईलवर OTP येईल. तो एन्टर केल्यानंतर Terms And Conditions वर क्लिक करा. त्यानंतर Submit चं बटन दाबून OTP Authentication ची प्रोसेस पूर्ण करा. त्यानंतर Preview Aadhaar Letter सोबत पेमेंटचीही स्क्रिन ओपन होईल. पेमेंट केल्यानंतर Digital Signature PDF Format मध्ये आधार डाउनलोडचं ऑप्शन येईल. त्यावेळी तुम्हाला SMS द्वारे Service Request Number मिळेल. त्यानंतर युजर्सला SRN Status ट्रॅक करता येईल.

First published:
top videos

    Tags: Aadhar card, Aadhar card link, M aadhar card