मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /बाबो! तब्बल 64 लाख रुपयांत झाली या iPhone ची विक्री, कारण ऐकून हैराण व्हाल

बाबो! तब्बल 64 लाख रुपयांत झाली या iPhone ची विक्री, कारण ऐकून हैराण व्हाल

नव्या सीरिजच्या iPhone 13 ची किंमती जवळपास 1 लाखाच्या घरात आहे. पण कधी एखादा आयफोन 64 लाख रुपयांत विक्री झाल्याचं ऐकलंय का? एका आयफोनची तब्बल 64 लाखांत विक्री झाली आहे. पण यामागे नेमकं कारण काय?

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : भारतासह जगभरात इतर स्मार्टफोनच्या तुलनेत iPhone ची मोठी क्रेझ आहे. iPhone इतर फोनच्या तुलनेत महागही असतात. नव्या सीरिजच्या iPhone 13 ची किंमती जवळपास 1 लाखाच्या घरात आहे. पण कधी एखादा आयफोन 64 लाख रुपयांत विक्री झाल्याचं ऐकलंय का? एका आयफोनची तब्बल 64 लाखांत विक्री झाली आहे. त्याशिवाय इतक्या किंमतीत विक्री होण्यासाठी हा आयफोन लेटेस्टही नाही.

64 लाखात विक्री झालेला हा आयफोन 2017 मधील आहे. iPhone X Apple ने 2017 मध्ये लाँच केला होता. हा आयफोन एका व्यक्तीने तब्बल 86,001 डॉलर्समध्ये विकला आहे. पण यामागे नेमकं कारण काय?

iPhone मध्ये चार्जिंगसाठी लाइटनिंग पोर्ट दिला जातो. यावेळी कंपनी लेटेस्ट iPhone 13 सोबत USB Type C पोर्ट देण्याचा अंदाज होता. परंतु असं झालं नाही. iPhone X सोबतही USB Type C पोर्ट देण्यात आला नव्हता. परंतु एका इंजिनियरने iPhone X मध्ये USB Type C पोर्ट लावला आणि तो कामही करू लागला.

iPhone X मध्ये इंजिनियरने Type C पोर्ट लावल्यानंतर हा फोन लिलावासाठी eBay वर लिस्ट करण्यात आला. iMore च्या एका रिपोर्टनुसार, या iPhone X साठी जास्तीत जास्त 86 डॉलरची बोली लावण्यात आली आहे.

1 नोव्हेंबर रोजी USB Type C वाला iPhone X लिलावात ठेवण्यात आला. हळूहळू यात अनेकांनी इंटरेस्ट दाखवला. सुरुवातीला 1600 डॉलरची बोली लावण्यात आली होती. त्यानंतर 86 हजार डॉलरपर्यंत बोली पोहोचली आणि या किंमतीत फोनची विक्री झाली.

Steve Jobsयांनी तयार केलेल्या पहिल्या Apple Computerचा लिलाव,कोट्यवधींमध्ये बोली

Ken Pillonel नावाच्या व्यक्तीने iPhone X मध्ये USB Type C पोर्ट लावला. आयफोन पहिल्यांदाच USB Type C चार्जरने चार्ज केला जाऊ शकतो. USB Type C पोर्ट असणारा हा जगातला पहिला आयफोन असल्याचं Ken Pillonel याने म्हटलं आहे. हा लावण्यात आलेला पोर्ट केवळ चार्जिंगसाठी नसून, त्याने डेटाही ट्रान्सफर केला जाऊ शकतो. Ken Pillonel स्विस फेडर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये रोबॉटिकचा विद्यार्थी असून तो याच स्ट्रिममध्ये मास्टर्स करत आहे.

First published:
top videos

    Tags: Iphone, Tech news