मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे तुमचं Aadhaar Card,घरबसल्या सोप्या पद्धतीने असं तपासा

कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे तुमचं Aadhaar Card,घरबसल्या सोप्या पद्धतीने असं तपासा

अनेकदा संभ्रम निर्माण होतो की आधार कार्ड कोणत्या बँक अकाउंटशी आणि मोबाइल नंबरशी लिंक आहे. घरबसल्या ऑनलाइनरित्या कोणत्या बँकेशी, मोबाइल नंबरशी आधार लिंक आहे, हे तपासता येतं.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 15 जानेवारी : Aadhaar Card प्रत्येक भारतीय नागरिकासाठी सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. बँक खात्यापासून सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डची गरज असते. इन्कम टॅक्ससंबंधित कामांसाठीही आधार कार्डची गरज असते. त्यामुळे आधार कार्ड बँक खातं, मोबाइल नंबर आणि पॅन कार्डशी लिंक असणं गरजेचं ठरतं. आधार कार्ड नसल्यास कोणतंही काम करणं कठीण होऊ शकतं.

एका व्यक्तीचं एक आधार कार्ड असतं. आधार कार्ड एक असलं, तरी एका व्यक्तीचे अनेक मोबाइल नंबर आणि अनेक बँक अकाउंटही असतात. त्यामुळे अनेकदा संभ्रम निर्माण होतो की आधार कार्ड कोणत्या बँक अकाउंटशी आणि मोबाइल नंबरशी लिंक आहे. घरबसल्या ऑनलाइनरित्या कोणत्या बँकेशी, मोबाइल नंबरशी आधार लिंक आहे, हे तपासता येतं.

कोणीच करू शकत नाही तुमच्या Aadhaar card चा चुकीचा वापर, असं करा Lock

- सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइट www.uidai.gov.in वर जा.

- इथे Check Your Aadhaar and Bank Account वर क्लिक करा.

- इथे आधार नंबर आणि सिक्योरिटी कोड टाकावा लागेल.

- आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक OTP येईल.

- OTP UIDAI वेबसाइटवर टाका.

- इथे लॉगइन ऑप्शन येईल, त्यावर क्लिक करा.

- लॉगइन केल्यानंतर आधारशी जोडलेली सर्व बँक अकाउंट्स डिटेल्स समोर येतील.

तुमचं Digital Health ID Card आहे का? आधी फायदे वाचा आणि काही मिनिटात बनवून घ्या

कसं Lock कराल Aadhaar Card -

आधार कार्ड लॉक करण्यासाठी सर्वात आधी आधारशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवरुन 1947 वर GETOTP मेसेज लिहून पाठवावा लागेल. मेसेज पाठवल्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवर एक OTP येईल. तुम्हाला पुन्हा 1947 या नंबरवर ‘LOCKUID आधार नंबर’ आणि हा OTP लिहून पाठवायचा आहे. अशाप्रकारे तुमचं आधार कार्ड लॉक होईल.

First published:

Tags: Aadhar card, Aadhar card link, Tech news