मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Tata Sky ची धमाकेदार ऑफर; ग्राहकांसाठी मोठं दिवाळी गिफ्ट

Tata Sky ची धमाकेदार ऑफर; ग्राहकांसाठी मोठं दिवाळी गिफ्ट

दिवाळीनिमित्त अनेक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या बंपर ऑफर देत असून आता त्यातच ब्रॉडकास्ट सॅटेलाइट सर्विस कंपनी Tata Sky ने ही एक धमाकेदार ऑफर लॉन्च केली आहे.

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : सध्या दिवाळीनिमित्त अनेक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या बंपर ऑफर देत आहेत. त्यातच आता ब्रॉडकास्ट सॅटेलाइट सर्विस कंपनी Tata Sky ने ही एक धमाकेदार (Tata Sky company big offer on Diwali festival) ऑफर लॉन्च केली आहे. या ऑफरचा ग्राहकांना थेट फायदा होणार आहे. कंपनीने दिवाळीनिमित्त (Diwali festival 2021) घोषीत केलेल्या या ऑफरमध्ये लोकांना HD क्वालिटीचे सेट अप बॉक्स मोफत दिले जाणार आहेत. परंतु त्यासाठी ग्राहकांना काही नियम आणि अटी पूर्ण कराव्या लागणार आहे. त्यानंतर त्यांना या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.

Tata Sky कंपनीच्या या ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना सर्वात आधी चार हजार रूपये भरावे लागतील. ते पैसे ग्राहकाच्या Tata Sky च्या अकाउंटमध्येच राहणार आहेत. त्यानंतर त्यांना मोफत सेटअप बॉक्स (HD setup box) आणि त्याची स्किम दिली जाईल. या ऑफरमुळे ग्राहकांना आपल्या आवडीचे आणि पसंतीचे चँनल्स पाहता येणार आहे.

WhatsApp मध्ये येणार हे धमाकेदार फीचर; आता App वापरणं होणार आणखी सोपं

कसा घेता येणार या ऑफरचा लाभ?

या ऑफरसाठी सर्वात आधी ग्राहकांना चार हजार रूपये भरावे लागतील. ते त्यांच्या Tata Sky च्या अकाउंटमध्ये जमा होतील. त्यानंतर ग्राहकाचं अकाऊंट अ‍ॅक्टिवेट होईल आणि त्यांना कंपनीतर्फे सबस्क्रिप्शन प्लॅन्स लागू करण्यात येईल. त्यामुळे आता या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना वेगळे पैसे भरावे लागणार नाही.

Smart Phone Problem : गूगल पिक्सलचा हा स्मार्टफोन निघाला 'चायनीज माल'

त्याचबरोबर टाटा स्कायतर्फे 1499 रूपयाच्या रिचार्जवर 150 रूपयांचीही सूट देण्यात येत आहे. दिवाळीनिमित्त जर तुम्ही TV चं रिचार्ज करणार असाल, तर त्यासाठी ही स्किम फायदेशीर ठरणार आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला टाटा स्कायच्या tatasky.com या वेवसाईटवर जाऊन आपलं नाव, नंबर आणि इतर डिटेल्स द्यावे लागतील. त्यानंतर या ऑफरचा फायदा घेता येईल.

First published:

Tags: Discount offer, Sale offers, Tata group