मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

WhatsApp मध्ये येणार हे धमाकेदार फीचर; आता App वापरणं होणार आणखी सोपं

WhatsApp मध्ये येणार हे धमाकेदार फीचर; आता App वापरणं होणार आणखी सोपं

व्हॉट्सअॅप कंपनी सध्या एक धमाकेदार फीचर्स आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं व्हॉट्सअॅप (WhatsApp) वापरकर्त्यांना अॅप वापरताना मल्टी-टास्किंग करणं सोपं होणार आहे.

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : व्हॉट्सअॅप कंपनी सध्या एक धमाकेदार फीचर्स आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं व्हॉट्सअॅप (WhatsApp) वापरकर्त्यांना अॅप वापरताना मल्टी-टास्किंग करणं सोपं होणार आहे. प्रामुख्यानं या बदलांमध्ये पिक्चर-इन-पिक्चर Video मोड (Picture-in-Picture Video Mode)चा समावेश असणार आहे. या प्रोसेसला सध्या (amazing new features in WhatsApp) अपडेट करण्यात येत असल्याने आता त्याचा व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना फायदा होणार आहे.

WABetaInfo ने दिलेल्या रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅप कंपनी ही पिक्चर-इन-पिक्चर मोड संदर्भात एका नव्या डिझाईनची टेस्टींग करत असून ज्यामध्ये चॅटींग करत असताना Video कॉलही करता येणार आहे. त्यामुळं यूजर्स एकाचवेळी (WhatsApp will be easier to use) एकापेक्षा अधिक काम एकाच व्हॉट्सअॅपवर करणार आहेत.

जगातील सर्वात मोठ्या लसीकरणासाठी फायदेशीर ठरलं Co-WIN App; काय आहे खासियत

काय आहे पिक्चर-इन-पिक्चर Video मोड?

काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने एक नवा फीचर्स जारी केला होता त्याद्वारे आपल्याला इन्स्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब या तिनही अॅपला वापरताना यूजर्स व्हॉट्सअॅपवर मेसेज करू शकत होते. त्यात Video पाहण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअॅपची विंडो बंद करण्याची गरज नव्हती. आता या फीचर्सची टेस्टींग सुरू करण्यात आली असून हा बदल अनेक अॅड्रॉईड स्मार्टफोन्समध्ये पाहण्यात आला आहे.

WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅप चॅट Encrypted असतानाही बॉलिवूडच्याच चॅट कशा होतात लीक?

परंतु व्हॉट्सअॅपने नेमक्या कोणत्या मोबाईल्सवरती ही अपडेट आणलेली आहे हे अजून कळू शकलेलं नाही. काही दिवसांपूर्वी तांत्रिक बिघाडामुळं व्हॉट्सअॅपची सुविधा काही तासांसाठी जगभरात ठप्प झाली होती. त्यावेळी व्हॉट्सअॅप कंपनीला फार ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर काही तासांनंतर व्हॉट्सअॅप पुन्हा सुरू करण्यात आलं.

First published:

Tags: WhatsApp chats, WhatsApp features, Whatsapp News