• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Smart Phone Problem : गूगल पिक्सलचा हा स्मार्टफोन निघाला 'चायनीज माल'; सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

Smart Phone Problem : गूगल पिक्सलचा हा स्मार्टफोन निघाला 'चायनीज माल'; सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस

गूगल पिक्सल कंपनीने आपल्या स्मार्टफोन्समध्ये लेटेस्ट अँड्रॉईड 12 ऑपरेटिंग सिस्टमचं अपडेट दिलं होतं. त्यानंतर पिक्सल मोबाईल वापरणाऱ्यांनी हे व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये अपडेट केल्यानंतर आता त्यांच्या मोबाईलमध्ये अडचणी (pixel mobiles crash after Android 12 update ) येऊ लागल्या आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : गूगल पिक्सल कंपनीने आपल्या स्मार्टफोन्समध्ये लेटेस्ट अँड्रॉईड 12 ऑपरेटिंग सिस्टमचं अपडेट दिलं होतं. त्यानंतर पिक्सल मोबाईल वापरणाऱ्यांनी हे व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये अपडेट केल्यानंतर आता त्यांच्या मोबाईलमध्ये अडचणी (pixel mobiles crash  after Android 12 update ) येऊ लागल्या आहेत. त्यामुळं संतापलेल्या लोकांनी याविषयी आपल्या तक्रारी सोशल मीडियावर (social media) लिहायला सुरूवात केली आहे. त्यात प्रामुख्याने लोकांना पिक्सलच्या स्मार्टफोनमध्ये (google pixel mobiles ) टच रिस्पॉन्स आणि मोबाईलमधील अॅप क्रॅश होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. ज्या लोकांना आता या तक्रारी येऊ लागल्या आहेत त्यांनी गूगल फोरमवर आपल्या तक्रारी द्यायला सुरूवात केल्या आहेत. अनेत यूजर्सच्या तक्रारी आहे की स्मार्टफोन्समध्ये लेटेस्ट अँड्रॉईड 12 ऑपरेटिंग सिस्टमला अपडेट केल्यानंतर बॅटरी ड्रेनची (Smart Phone Problem) ही अडचण येत आहे. त्याचबरोबर हा प्रॉब्लेम आल्यानंतर मोबाईलची चार्जिंग ही फार लवकर संपत असून मोबाईल गरम होत आहे. भारत-पाकिस्तान T20 मॅच पाहण्यासाठी 3GB नेटपॅक; रोमांच मिस करू नका हे आहेत Plans या अडचणी या पिक्सलच्या एकाच मॉडेलवरती येत नसून वेगवेगळ्या प्रकारच्या मॉडेलमध्येही येत आहे. त्यामुळं जर तुमच्याकडे पिक्सलचा स्मार्टफोन असेल तर त्याला लगेच अपडेट करण्याची घाई करू नका. कारण सध्या पिक्सल 3 या मॉडेलसह इतर मॉडेलवरही हे अपडेट देण्यात आलं आहे. Amazon: दिवाळीत गिफ्ट देण्याची चांगली संधी, ब्रँडेड मोबाइलवर चक्क 3 हजारांची सूट गूगल पिक्सल या स्मार्टफोनला वापरकर्त्यांच्या असुरक्षिता आणि त्याच्या प्रायव्हसीबद्दल नेहमीच टार्गेट करण्यात आलं आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन गूगल पिक्सलने हे अपडेट दिलं होतं. परंतु आता ते कंपनीसाठी डोकेदुखीचं कारण ठरण्याची शक्यता आहे.
  Published by:Atik Shaikh
  First published: