मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Smartphone खरेदी करताना या गोष्टींची घ्या काळजी; नाहीतर होईल नुकसान

Smartphone खरेदी करताना या गोष्टींची घ्या काळजी; नाहीतर होईल नुकसान

नवा स्मार्टफोन खरेदी केल्यावर... अरे यार तो दुसरा घ्यायला हवा होता, असं तुमच्याही बाबतीत होतं का? नवीन smartphone खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर आधी हे वाचा..

नवा स्मार्टफोन खरेदी केल्यावर... अरे यार तो दुसरा घ्यायला हवा होता, असं तुमच्याही बाबतीत होतं का? नवीन smartphone खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर आधी हे वाचा..

नवा स्मार्टफोन खरेदी केल्यावर... अरे यार तो दुसरा घ्यायला हवा होता, असं तुमच्याही बाबतीत होतं का? नवीन smartphone खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर आधी हे वाचा..

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : मार्केटमध्ये दर महिन्याला वेगवेगळे फीचर्स असलेले स्मार्टफोन्स येत आहेत. त्यात जास्त मेगापिक्सल कॅमेरा असलेले स्मार्टफोन किंवा फोल्डिंगची सुविधा आणि (smartphone buying tips) चांगला बॅटरी बॅकअप असलेले smartphone ही बाजारात विक्रीसाठी विविध कंपन्यांनी आणले आहेत. त्यामुळं ग्राहकांना हव्या असलेल्या फीचर्सच्या स्मार्टफोनसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहे.

त्याचबरोबर अनेकदा युजर्सला स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर दुसऱ्या एखाद्या स्मार्टफोनमध्ये आलेल्या फीचर्समुळं (new features in smartphone) संबंधित स्मार्टफोन खरेदी केल्याचा पश्चाताप होतो. त्यामुळं आता जर तुम्ही नवीन smartphone खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर खरेदीवेळी नेमक्या कोणत्या गोष्टींची (how to choose the right smartphone) काळजी घ्यायला हवी, याबद्दल काही माहिती जाणून घेऊयात.

आपली गरज काय ते आधी ओळखा

smartphone खरेदी करण्याआधी आपल्याला स्मार्टफोन कोणत्या कामांसाठी आणि कशासाठी हवा आहे, याची खात्री करा. त्यानंतर कॅमरा, बॅटरी, डिस्प्ले, वजन आणि युजर्सचं आर्थिक बजेट याचा मेळ लावा. त्यामुळं युजर्सला नेमका कोणता स्मार्टफोन घ्यायचा आहे आणि कितीपर्यंत घ्यायचा आहे. याची क्लियरीटी येईल.

Windows 11: `विंडोज 11` यूजर्ससाठी ठरतंय डोकेदुखी; हे` फीचर्स ठरताहेत निकामी

स्मार्टफोनचा Performance

सध्याच्या काळात 15 ते 22 हजार रूपयांच्या रेंजमध्ये युजर्सला हवे असलेले सर्व फीचर्स स्मार्टफोनमध्ये मिळतात. म्हणून स्मार्टफोन खरेदी करताना तो नवा आणि System on chip असायला हवा. त्याचबरोबर खरेदी करताना सहा महिने ते एका वर्षांपेक्षा अधिक काळ जूना स्मार्टफोन खरेदी करू नये.

RAM आणि स्टोरेज

स्मार्टफोन खरेदी करताना त्यात जास्त रॅम असायला हवी, असाच स्मार्टफोन खरेदी करा. त्यात कमीत कमी 128 जीबीचं स्टोरेज असायला हवं. कारण जास्त MB असलेले गेम्स खेळता येतील आणि युजर्सला HD Videos सहजरित्या पाहता आणि डाउनलोड करता येतील.

Google Update: 9 नोव्हेंबरपासून बदलणार लॉगइनची पद्धत; गुगलनं उचललं मोठं पाऊल

बॅटरी जास्त असायला हवी

सध्या बाजारात 6 ते 7 हजार MAH पर्यंत बॅटरी असलेले अनेक स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध आहेत. तज्ञांच्या मते स्मार्टफोनमध्ये जितक्या जास्त MAH ची बॅटरी असेल तितका चांगला बॅटरी बॅकअप युजर्सला मिळतो. त्यामुळं 4500 ते 5000 MAH पर्यंत बॅटरीक्षमता असलेले स्मार्टफोन खरेदी करायला हवे. त्याचबरोबर त्याच्या फास्ट चार्जिंगसाठी 33 किंवा 50 VAT चा चार्जर असायला हवा.

5G स्मार्टफोन घ्यायला हवा की नको?

भारतात अनेक कंपन्या 5G स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं आता 5G स्मार्टफोनचा वापर करायला हवा की नको यावर देशात चर्चा सुरू आहे. परंतु 5G स्मार्टफोन बाजारात येण्यासाठी किमान दोन वर्षांचा काळ लागू शकतो. त्यामुळं जर तुम्ही एक ते दोन वर्षांसाठी स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 4G स्मार्टफोन घ्या नाही तर 5G स्मार्टफोन लॉंग टर्मसाठी फायदेशीर ठरू शकतो.

तुम्ही Google Pay चा UPI पिन विसरलाय? पाहा नवीन PIN सेट करण्याची सोपी प्रोसेस

कॅमेरा किती मेगापिक्सेल असायला हवा

कॉलिंगशिवाय आता लोकांना जास्त मेगापिक्सल कॅमेरा स्मार्टफोनमध्ये हवा असतो. त्यामुळं चांगल्या फोटोग्राफीसाठी 48 किंवा 64 मेगापिक्सलचा कॅमेरा परफेक्ट आहे. त्यामुळं कॅमेऱ्यासाठी कोणत्या कंपनीचा स्मार्टफोन योग्य आहे, याचीही खातरजमा करायला हवी.

या गोष्टींचीही घ्या काळजी

स्मार्टफोन खरेदी करताना त्यात Amoled स्क्रीन आणि फुल एचडी डिस्प्ले असायला हवा, त्याचबरोबर फोनचं वजन जास्त असायला नको. सहजरित्या स्मार्टफोन हाताळता आला पाहिजे. त्यामुळं आता या काही टिप्सचा तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करताना नक्कीच फायदा होईल.

First published:
top videos

    Tags: Mobile, Smartphones