• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Instagram अकाऊंट डिलीट करण्याआधी या गोष्टींची घ्या काळजी; नाही तर होईल पश्चाताप

Instagram अकाऊंट डिलीट करण्याआधी या गोष्टींची घ्या काळजी; नाही तर होईल पश्चाताप

हल्लीच्या काळात लोकांना सोशल मीडियावर (social media) आपली मतं व्यक्त करणं फार आवडतं. त्यात फेसबुकपासून तर ट्विटर आणि इन्स्टाग्रामचाही समावेश आहे. परंतु जेव्हा आपल्याला या अॅप वापरण्याचा कंटाळा यायला लागतो तेव्हा आपण आपलं या अॅपवरील अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय घेतो.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : हल्लीच्या काळात लोकांना सोशल मीडियावर (social media) आपली मतं व्यक्त करणं फार आवडतं. त्यात फेसबुकपासून तर ट्विटर आणि इन्स्टाग्रामचाही समावेश आहे. परंतु जेव्हा आपल्याला या अॅप वापरण्याचा कंटाळा यायला लागतो तेव्हा आपण आपलं या अॅपवरील अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय घेतो. परंतु हा निर्णय घेत असताना आणि आपलं अकाऊंट (Instagram account) डिलीट करत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. कारण त्यात आपला डाटा आणि आपल्या महत्त्वाच्या अॅक्टीविटीज असतात. त्याचबरोबर काही लोकांना आपले इन्स्टाग्रामवर (Instagram ) आपले फोटोही शेयर करायला आवडतात. अशावेळी आपण जेव्हा आपलं अकाऊंट डिलीट करतो तेव्हा आपला हा सगळा डाटा जाण्याची भीती आपल्याला असते. त्यामुळं आता ते होऊ नये आणि आपला डाटा सेफ रहावा यासाठी आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत. WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅप चॅट Encrypted असतानाही बॉलिवूडच्याच चॅट कशा होतात लीक? आपल्याला आपलं अकाऊंट डिलीट करताना आपला डाटा परत मिळवण्याची पद्धत ही फार सोपी आहे. त्यासाठी सर्वात आधी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या प्रोफाईलवर जा आणि त्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या तीन लाईनवर क्लिक करा. त्यानंतर एक मेनू उघडेल. त्यातल्या पहिल्या ऑप्शनमधील सेटिंगला क्लिक करा त्यानंतर त्यातल्या चौथ्या ऑप्शनवरील सिक्युरिटी या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर डाटा अॅन्ड हिस्ट्रीचा पर्याय तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक करून आपला ईमेल टाका आणि एन्टर करा, त्यानंतर 48 तासांमध्ये तुमचा संपूर्ण डाटा ईमेल अड्रेसवर येईल. Mercedes-Benz : आता थेट ग्राहकाला विकणार कार; देशभरात एकाच किंमतीवर होणार विक्री अकाऊंट डिलीट कसं कराल? इन्स्टाग्रामच्या आपल्या प्रोफाइलवर जा आणि त्यातल्या तीन डॉट ऑप्शनमधील एडिट प्रोफाइलवर क्लिक करा. त्यात तुम्हाला माय अकाऊंटचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड विचारला जाईल. त्यात टेम्पररली डिअॅक्टीवेटचा (Account Deactivate or Delete) पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं इन्स्टाग्राम अकाऊंट कायमस्वरूपी बंद होईल.
  Published by:Atik Shaikh
  First published: