• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Mercedes-Benz : आता थेट ग्राहकाला विकणार कार; देशभरात एकाच किंमतीवर होणार विक्री

Mercedes-Benz : आता थेट ग्राहकाला विकणार कार; देशभरात एकाच किंमतीवर होणार विक्री

प्रसिद्ध जर्मन कंपनी मर्सिडीज-बेंझ आता भारतात थेट ग्राहकांना कार विकणार आहे. त्यामुळं आता भारतातील (Mercedes will now sell cars directly to customers) ग्राहकांना थेट डिलरकडूनही ही कार विकत घेता येणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : प्रसिद्ध जर्मन कंपनी मर्सिडीज-बेंझ आता भारतात थेट ग्राहकांना कार विकणार आहे. त्यामुळं आता भारतातील (Mercedes will now sell cars directly to customers) ग्राहकांना थेट डिलरकडूनही ही कार विकत घेता येणार आहे. मर्सिडीजने (Mercedes-Benz) काही दिवसांपूर्वीच 'रिटेल ऑफ द फ्यूचर'(ROTF)योजनेची भारतीय बाजारासाठी घोषणा केली होती. आता कंपनीनं या योजनेला अधिकृतरित्या लॉन्च केल्यामुळं भारतीय ग्राहकांना याचा मोठा लाभ होणार आहे. आता भारत ROTF लागू करणारा जगातील चौथा देश ठरणार आहे. एका व्हर्चुअल इव्हेंट्समध्ये मर्सिडीज-बेंझ इंडियाचे डायरेक्टर आणि CEO मार्टिन श्वेंक यांनी याविषयी बोलताना म्हटलं आहे की ROTF हा एक यूनिट कस्टमर सेंट्रिक बिजनेस मॉडल आहे. जो ग्राहकांच्या (customer)मागण्या पूर्ण करेल. त्याचबरोबर या योजनेमुळं डिलरलाही फायदा होणार आहे. त्यामुळं आम्ही सध्या ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. Twitter : ट्विटर करतोय उजव्या विचारांच्या ट्विटर हॅडल्सला प्रमोट - संशोधन मर्सिडीज-बेंझ च्या या थेट डिलरमार्फत होणाऱ्या विक्रीच्या पद्धतीमुळं आतापर्यंत 1700 मर्सिडीज बुक करण्यात आल्या आहे. त्याचबरोबर मर्सिडीज कारची किंमत देशभरात एकसमान (Mercedes same price across in the country)असणार असल्याचंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. जगातील सर्वात मोठ्या लसीकरणासाठी फायदेशीर ठरलं Co-WIN App; काय आहे खासियत कंपनी आपल्या ग्राहकांच्या ऑर्डरमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी त्यांना VIN नंबर देणार आहे. त्याचबरोबर आता ग्राहकांना केवळ 50 हजार रूपयांमध्ये मर्सिडीज गाडी बुक करता येणार आहे. एकदा गाडी बुक केल्यानंतर पुढच्या 14 दिवसांमध्ये ग्राहकाची ऑर्डर पूर्ण केली जाईल, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.
  Published by:Atik Shaikh
  First published: