मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

लाँच आधीच लीक झाले Vivo V23E फीचर्स, पाहा Smartphone मध्ये काय असेल खास

लाँच आधीच लीक झाले Vivo V23E फीचर्स, पाहा Smartphone मध्ये काय असेल खास

VIVO लवकरच V-सीरीजच्या V23E स्मार्टफोन लॉन्चची तयारी करत आहे. परंतु या लॉन्चिंगआधीच या स्मार्टफोनचे Specifications लीक झाले आहेत.

VIVO लवकरच V-सीरीजच्या V23E स्मार्टफोन लॉन्चची तयारी करत आहे. परंतु या लॉन्चिंगआधीच या स्मार्टफोनचे Specifications लीक झाले आहेत.

VIVO लवकरच V-सीरीजच्या V23E स्मार्टफोन लॉन्चची तयारी करत आहे. परंतु या लॉन्चिंगआधीच या स्मार्टफोनचे Specifications लीक झाले आहेत.

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर : स्मार्टफोन कंपनी VIVO ने विविध स्मार्टफोन लाँच करत जागतिक आणि भारतीय मार्केटमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. आता कंपनी लवकरच V-सीरीजच्या V23E स्मार्टफोन लॉन्चची तयारी करत आहे. परंतु या लॉन्चिंगआधीच या स्मार्टफोनचे Specifications लीक (Specifications of VIVO V23E smartphone leaked before launch) झाले आहेत.

विशेष म्हणजे VIVO च्या V23E या स्मार्टफोनच्या अनबॉक्सिंगचा एक Video ही लीक झाला असून त्यात त्याच्या स्पेसिफिकेशनचा खुलासा करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या अनबॉक्सिंग Video मध्ये देण्यात आलेल्या (vivo v23e price and features) माहितीनुसार या स्मार्टफोनमध्ये वॉटर ड्रॉप नॉच डिझाईन आणि ग्लास बॅक पॅनल देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Amazon वर ऑर्डर केलं Passport Cover,डिलीव्हर झाला भलत्याच व्यक्तीचा खरा पासपोर्ट

काय असतील फीचर्स?

लीक झालेल्या अनबॉक्सिंग Video मध्ये दिलेल्या माहितीनुसार, VIVO V23E मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात येणार असून ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी शूटर कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी लेंस आणि 2 मेगापिक्सल माइक्रो सेंसर असणार आहे. त्याचबरोबर 50 मेगापिक्सलचा फ्रंट सेल्फी कॅमेरा असेल. त्याचबरोबर 8+128GB चं स्टोरेजही (vivo new model 2021) या स्मार्टफोनमध्ये असणार आहे. स्मार्टफोनच्या वरच्या भागात मायक्रोफोनचीही सुविधा देण्यात येणार आहे.

आजपासून खरेदी करता येईल JioPhone Next,पाहा केवळ 1999 रुपयांत कसा कराल बुक

त्यात एक सीम स्लॉट आणि स्पीकर ग्रिलही देण्यात येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 4,030 MAH बॅटरी बॅकअपही देण्यात येईल, अशी माहिती व्हायरल झालेल्या अनबॉक्सिंग Video मध्ये देण्यात आली आहे. लीक झालेल्या या माहितीनुसार या स्मार्टफोनची किंमत 32,900 रूपये एवढी असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हा हॅडसेट निळ्या कलरमध्ये असण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Price, Smartphone, Vivo