नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर : Jio आणि Google ने मिळून सर्वात स्वस्त स्मार्टफोन JioPhone Next लाँच केला आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी केवळ 1,999 रुपये भरावे लागतील. त्यानंतर बाकी पैसे 18 ते 24 महिन्यांत भरता येतील. हप्त्यावर फोन घ्यायचा नसल्यास 6,499 रुपये देऊन स्मार्टफोन खरेदी करता येईल.
JioPhone Next मध्ये 13 मेगापिक्सल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. फोनची साइज 5.45 इंची + मल्टीटच असून कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 एंटीफिंगरप्रिंट कोटिंग देण्यात आलं आहे.
त्याशिवाय फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन QM-215, Quad Core upto 1.3 Ghz प्रोसेसर आहे. 2GB रॅम आणि 32GB इनबिल्ट मेमरी आहे. फोनला 3500mAH बॅटरीही असून कनेक्टिव्हिटीसाठी wifi, v4.1 ब्लूटूथ, मायक्रो USB आणि 3.5mm स्टँडर्ड ऑडियो जॅक आहे.
कसं कराल फोन बुकिंग -
- रिलायन्स जिओच्या JioPhone Next चं बुकिंग तीन प्रकारे करता येईल. jio.com/NEXT लिंकवर जा. त्यानंतर I am Interested पर्यायावर क्लिक करा. इथे युजरची काही माहिती मागितली जाईल, यात नाव-फोन नंबर असेल. त्यानंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. मोबाइल नंबर वेरिफाय करावा लागेल.
- दुसरी पद्धत WhatsApp वरुन बुकिंग करण्याची आहे. त्यासाठी फोनमध्ये 7018270182 हा नंबर सेव्ह करुन त्यावर Hi पाठवावं लागेल. त्यानंतर चॅटद्वारे इतर माहिती मागितली जाईल. त्यानंतर Jio फोन बुक होईल.
- JioPhone Next जियोमार्ट डिजिटल रिटेल स्टोरवर (JioMart Digital Store) बुक करता येईल.
हा फोन मेन इन इंडिया, मेड फॉर इंडिया आहे. JioPhone Next रिलायन्स रिटेलच्या देशभरातील जियोमार्ट रिटेल स्टोर्सवर उपलब्ध होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.