मराठी बातम्या /बातम्या /देश /बापरे! गेम खेळता खेळता झाला Mobile blast; चिमुकल्यांच्या शरीरात घुसले बॅटरीचे तुकडे

बापरे! गेम खेळता खेळता झाला Mobile blast; चिमुकल्यांच्या शरीरात घुसले बॅटरीचे तुकडे

मोबाईल गेम खेळताना बॅटरीचा स्फोट (Mobile blast) झाल्याने तीन लहान मुलं गंभीररित्या जखमी झाली.

मोबाईल गेम खेळताना बॅटरीचा स्फोट (Mobile blast) झाल्याने तीन लहान मुलं गंभीररित्या जखमी झाली.

मोबाईल गेम खेळताना बॅटरीचा स्फोट (Mobile blast) झाल्याने तीन लहान मुलं गंभीररित्या जखमी झाली.

भोपाळ, 28 ऑक्टोबर : सध्या लहान मुलांनाही मोबाईलचं (Mobile) वेड लागलं आहे. अगदी खाताना, झोपतानाही त्यांना मोबाईल हवा असतो. मोबाईलसाठी कितीतरी मुलं हट्ट करताना दिसतात (Children playing with Mobile). मुलं रडायला लागली किंवा मुलं त्यानिमित्ताने तरी ऐकतील, शांत बसतील पण पालकही बिनधास्तपणे त्यांच्या हातात मोबाईल देतात  (Children playing Mobile game). हा मोबाईल लहान मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम तर करतोच पण तो त्यांच्या जीवासाठीही धोकादायक ठरू शकतो. सध्या असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे (Mobile blast). मोबाईलवर गेम खेळणाऱ्या लहान मुलांच्या हातातच मोबाईलचा ब्लास्ट झाला आहे (Mobile blast while playing game).

मध्य प्रदेशच्या (Madhya pradesh) दतिया जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना. मोबाईलच्या ब्लास्टमुळे तीन लहान मुलं गंभीररित्या जखमी झाले आहेत. तिघंही मुलं मोबाईलवर गेम खेळत होते. त्यावेळी मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला. त्या तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

पंजाब केसरीच्या वृत्तानुसार सुमित, गौरव आणि रमन अशी या जखमी मुलांची नावं आहेत. तिघांचं वय अनुक्रमे 11 वर्षे, 7 वर्षे आणि 6 वर्षे आहे. ही तिन्ही  मुलं एकाच कुटुंबातील आहेत.

हे वाचा - तुमचं मूलही मोबाईलशिवाय जेवत नाही का; मग हे वाचाच

बुधवारी ही मुलं मोबाईलमध्ये गेम खेळत होती. तेव्हा बॅटरीचा स्फोट झाला आणि स्फोटाचा मोठा आवाजही आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. मुलांना अॅम्ब्युलन्समधून तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. मुलांच्या शरीरात बॅटरीचे तुकडे घुसल्याचंही सांगितलं जातं आहे. डॉक्टरांनी हे तुकडे त्यांच्या शरीरातून बाहेर काढले असून आता तिघांचीही प्रकृती ठिक असल्याची माहिती मिळते आहे.

मोबाइल फोनच्या बॅटरीचा स्फोट का होतो?

मोबाइलची बॅटरी जर गरजेपेक्षा जास्त चार्ज केली तर मोबाइलचा स्फोट होऊ शकतो. बहुतांश फोनमध्ये बॅटरी जास्त चार्ज होऊ नये म्हणून व्यवस्था असते. पण तरीही फोन चार्ज करताना खबरदारी घेतली नाही तर मोबाइलचा स्फोट होऊ शकतो.

गेल्या काही काळात कंपन्यांनी वेगाने चार्ज होणारे स्मार्टफोन आणले आहेत. अशा प्रकारे वेगाने चार्ज केलेल्या फोनमध्ये जास्त एनर्जी साठवली जाते. अशा फोनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन स्फोट होऊ शकतो.

हे वाचा - तुमच्या मुलांकडे स्मार्टफोन आणि Social Media अकाउंट आहे का? होऊ शकतो गंभीर परिणाम

मोबाइल तज्ज्ञांच्या मते, चार्जिंग करताना फोनचा वापर केला तर मोबाइल आणि बॅटरी हे दोन्हीही गरम होतं. मोबाइल चार्ज करताना स्फोट होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मोबाइल चार्ज करताना त्याचा वापर करणं टाळलं पाहिजे.

मोबाइलची जुनी झालेली बॅटरी किंवा कमी दर्जाची बॅटरी वापरणंही धोकादायक ठरू शकतं.

मोबाईलचा स्फोट होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी?

1. मोबाइलचा स्फोट होऊ नये यासाठी ओरिजिनल चार्जरनेच फोन चार्ज करा.

2. चार्जिंग करताना मोबाइलचा वापर टाळा

3. फोन गरम जागी ठेवू नका.

4. फोनची बॅटरी गरजेपेक्षा जास्त वेळ चार्ज करू नका.

5. फोन गरम होईल किंवा हँग होईल अशी अॅप्स इन्स्टॉल करू नका.

6. वेगाने चार्ज होणारे फोन खरेदी करू नका.

First published:
top videos

    Tags: Madhya pradesh, Mobile, Mobile Phone