मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमचा Smartphone गरम होतोय?; पाहा काय आहेत कारणं आणि उपाय...

तुमचा Smartphone गरम होतोय?; पाहा काय आहेत कारणं आणि उपाय...

लोकांना सध्या मनोरंजन आणि काही ऑफिशीयल कामं ही स्मार्टफोनवरून करायला आवडत आहे. त्यामुळं आता स्मार्टफोन्सचा वापर मोठ्या प्रमाणाच वाढत आहे. त्याचबरोबर काही विशिष्ट स्मार्टफोन्समध्ये गेमिंग, Video रेकॉर्डिंग किंवा उन्हामुळंही स्मार्टफोन्स (smartphone overheating) गरम व्हायला लागतात.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : लोकांना सध्या मनोरंजन आणि काही ऑफिशीयल कामं ही स्मार्टफोनवरून करायला आवडत आहे. त्यामुळं आता स्मार्टफोन्सचा वापर मोठ्या प्रमाणाच वाढत आहे. त्याचबरोबर काही विशिष्ट स्मार्टफोन्समध्ये गेमिंग, Video रेकॉर्डिंग किंवा उन्हामुळंही स्मार्टफोन्स (smartphone overheating) गरम व्हायला लागतात. त्यामुळं आपल्याला अनेकदा मोबाईलच्या ओव्हरहिटींगचा सामना करावा लागतो. मोबाईलची गरम होण्याची कारणं आणि त्यासाठी आपण त्याची काय काळजी घ्यायला हवी, याबद्दल आपण काही माहिती जाणून घेऊयात.

साधारणत: स्मार्टफोन्समध्ये अतिरिक्त अ‍ॅप्स असतील तर त्यावेळी जास्त स्पेसमुळं मोबाईल (mobile heating problem solution) गरम होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर काही विशिष्ट घातक व्हायरसमुळंही मोबाईल गरम होतो किंवा मोबाईल हा उन्हाच्या संपर्कात आल्यामुळंही गरम होतो. त्यामुळं या गंभीर समस्या स्मार्टफोन्समध्ये सतत येत असतील त्यासाठी काही उपाययोजना करण्याची गरज आहे.

कोणत्याही कागदपत्रांशिवाय काढता येईल Pan Card; पाहा सोपी प्रोसेस

या कारणांमुळं स्मार्टफोन होतो ओव्हरहिट

-स्मार्टफोनवर जास्त वेळ गेम खेळणे.

-जास्त वेळ Video शूट करणे.

-ब्राइटनेस वाढवून Video पाहणे.

-स्मार्टफोनमध्ये जून्या आणि आऊटडेटेड अ‍ॅप्स असणे.

-मोबाईलमध्ये सॉफ्टवेयर अपडेट्सचा प्रॉब्लेम असणे.

-दुसऱ्या चार्जरवरून मोबाईल चार्ज करणे.

-जास्त वेळ मोबाईलचा हॉट्सस्पॉट सुरू असणे.

तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? या 5 Digital Hiring Apps द्वारे होईल मोठी मदत

स्मार्टफोन ओव्हरहिट होऊ नये म्हणून काय कराल?

स्मार्टफोनला उन्हाच्या संपर्कात येऊ देऊ नका. त्याचबरोबर सतत अ‍ॅप्स अपडेट करत रहा. जास्त वेळ मोबाईलचा वापर टाळायला हवा. त्याचबरोबर सुरक्षितरित्या स्मार्टफोन्सची चार्जिग करायला हवी. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मोबाईल गरम होतो तेव्हा मोबाईलला फ्लाइट मोडवर टाकायला हवं. ज्यामुळं ते लवकरात लवकर थंड होईल.

First published:

Tags: Android, Mobile Phone, Smartphones