मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /कोणत्याही कागदपत्रांशिवाय काढता येईल Pan Card; पाहा सोपी प्रोसेस

कोणत्याही कागदपत्रांशिवाय काढता येईल Pan Card; पाहा सोपी प्रोसेस

कोणत्याही योजनेसाठी किंवा Online व्यवहारांसाठी आधार कार्डसह पॅन कार्डही आवश्यक आहे. ग्राहक इन्स्टंट पॅन कार्ड मिळवू शकतात. काही सोप्या स्टेप्सने हे काम करता येतं.

कोणत्याही योजनेसाठी किंवा Online व्यवहारांसाठी आधार कार्डसह पॅन कार्डही आवश्यक आहे. ग्राहक इन्स्टंट पॅन कार्ड मिळवू शकतात. काही सोप्या स्टेप्सने हे काम करता येतं.

कोणत्याही योजनेसाठी किंवा Online व्यवहारांसाठी आधार कार्डसह पॅन कार्डही आवश्यक आहे. ग्राहक इन्स्टंट पॅन कार्ड मिळवू शकतात. काही सोप्या स्टेप्सने हे काम करता येतं.

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : कोणत्याही योजनेसाठी किंवा Online व्यवहारांसाठी आधार कार्डसह पॅन कार्डही आवश्यक आहे. पॅन कार्डमध्ये 10 अंकी अल्‍फान्‍यूमेरिक (Get Pan Card without any documents) नंबर असतो. जो व्यवहारांसाठी अतिशय गरजेचा असतो. परंतु अनेकदा Pan Card गहाळ झाल्यावर ग्राहकांना ते परत कसं मिळवायचं किंवा त्याद्वारे व्यवहार कसा करायचा हा प्रश्न उपस्थित होतो.

आता केंद्र सरकारने ग्राहकांसाठी आधार कार्डला पॅन कार्डशी लिंक करण्याचा नियम जारी केल्यामुळे या ऑनलाईन (pan card apply online) व्यवहारांच्या प्रक्रियेत सुसुत्रता येत आहे. परंतु जेव्हा ग्राहकांकडे Pan Card नसतं, त्यावेळी केवळ आधार कार्डच्या सहाय्याने व्यवहार (pan card status check by aadhaar number) करता येऊ शकतो. तरीदेखील KYC करण्यासाठी Pan Card आवश्यकच असतं. अशावेळी ग्राहक इन्स्टंट पॅन कार्ड मिळवू शकतात. काही सोप्या स्टेप्सने हे काम करता येतं.

Instagram Reels डाउनलोड करायचे आहेत? एका सोप्या ट्रिकने असं होईल काम

कसं मिळवाल पॅन कार्ड?

Pan Card साठी इन्कम टॅक्स पोर्टलच्या वेबसाईटवर जाऊन इन्स्टंट Pan Card च्या ऑप्‍शनवर क्लिक करा. त्यानंतर E pan चा पर्याय ओपन होतो. त्यामधील Get new E-PAN या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आपला वैयक्तिक आधार नंबर टाका. त्यानंतर स्क्रिनवर खालीलपैकी काही पर्याय उपलब्ध होतील.

- यापूर्वी कधीही Pan Card मिळालेलं नाही.

- चालू मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक केलेला आहे.

- आधार कार्डवर जन्मादाखल्याची सर्व डिटेस्ल उपलब्ध आहे.

- पॅन कार्डसाठीची वयोमर्यादा पूर्ण केलेली नाही.

Pee Power : आता विजेची गरज नाही Urine ने चार्ज होणार Mobile

यापैकी आवश्यक असलेल्या पर्यायांना सिलेक्ट करून, OK केल्यानंतर तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. OTP टाकल्यानंतर 15 अंकी Acknowledgment नंबर जनरेट होईल.

नव्या Smartphone मध्ये असा ट्रान्सफर करा WhatsApp Data, पाहा सोपी पद्धत

त्यानंतर तयार झालेल्या नव्या पॅन कार्डची प्रत ही तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या ईमेल आयडीवर पाठवण्यात येईल. संबंधित ईमेल आयडी ओपन करून नवीन पॅन कार्ड डाऊनलोड करू शकता.

First published:

Tags: Online payments, Pan card, Pan card online