मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? या 5 Digital Hiring Apps द्वारे होईल मोठी मदत

तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? या 5 Digital Hiring Apps द्वारे होईल मोठी मदत

जाणून घेऊया नोकरी कशी शोधावी यासंबंधीच्या काही टिप्स.

जाणून घेऊया नोकरी कशी शोधावी यासंबंधीच्या काही टिप्स.

कोरोना काळात अनेक जणांचे जॉब गेल्याने, आता पुन्हा नोकरीसाठी मोठी शोधा-शोध करावी लागते आहे. अशात असे काही Digital Hiring Apps आहेत, ज्याद्वारे नवी नोकरी शोधण्यास मदत होऊ शकते.

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : कोरोना काळात लॉकडाउनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर कित्येकांचा पगार अर्ध्यावर आला. कोरोनाचा भारताच्या संपर्ण अर्थव्यवस्थेवरच मोठा परिणाम झाला. अनेक जणांचे जॉब गेल्याने, आता पुन्हा नोकरीसाठी मोठी शोधा-शोध करावी लागते आहे. अशात काही Apps द्वारे चांगली नोकरी शोधण्यासाठी प्रयत्न करू शकता. असे काही Digital Hiring Apps आहेत, ज्याद्वारे नवी नोकरी शोधण्यास मदत होऊ शकते.

- LinkedIn

- नोकरी शोधण्यासाठी Digital Hiring Apps मध्ये LinkedIn अतिशय फायदेशीर ठरतं. या पॉप्युलर प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमचं प्रोफाइल तयार करू शकता. त्यानंतर विविध लोकांसह Connections तयार करुन आपल्या फिल्डनुसार Job Search करू शकता.

- Monster

Monster देखील अतिशय पॉप्युलर Recruiter App आहे. या App वर आपला बायोडेटा तयार करुन अपलोड करता येतो. त्यानंतर कंपन्या आपल्या हिशोबाने फिल्टर करुन बायोडेटा पाहतात. त्याशिवाय यात कॉन्टॅक्ट डिटेल्स असल्याने रिक्रूटर थेट तुमच्याशी संपर्क करू शकतात.

- Hirect: Quick Startup Hiring

हे Hirect App खासकरुन हाय ग्रोथ स्टार्टअप्ससाठी डिझाइन करण्यात आलं आहे. हे चॅट आधारित डायरेक्ट हायरिंग App आहे. या App वर आतापर्यंत 1 मिलियनहून अधिक Startups Add करण्यात आले आहेत.

- Naukri Recruiter

Naukri.com हा सहजपणे नोकरी शोधण्याचा चांगला पर्याय आहे. याद्वारे हव्या त्या फिल्डनुसार जॉब सर्च करता येतो. या App मध्ये जॉब शोधणारा आणि नव्या लोकांची भरती करण्यासाठी Recruiter साठीही एक ID फीचर दिलं जातं. यामुळे नोकरीसाठी कॉल्स येण्याचं प्रमाण आणि नोकरी मिळण्याची शक्यता वाढते.

तुमच्या Smartphone सोबत तुम्ही नकळत 100 हून अधिक वेळा करता ही एक गोष्ट

- Workable

Workable हे Job search साठीचं Android App आहे. या App मध्ये पर्सनल प्रोफाइल, स्कोरकार्ड, ईव्हॅल्यूएशन आणि रिपोर्टसारखे अॅडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या App मध्ये Interview देखील शेड्यूल करता येतो.

First published:

Tags: Job, Job alert