जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Smartphone मध्ये आग लागण्याची 5 महत्त्वाची कारणं, अशी घ्या काळजी

Smartphone मध्ये आग लागण्याची 5 महत्त्वाची कारणं, अशी घ्या काळजी

Smartphone मध्ये आग लागण्याची 5 महत्त्वाची कारणं, अशी घ्या काळजी

नुकतंच इंडिगोच्या फ्लाइटमध्ये एक प्रवाशाच्या स्मार्टफोनमध्ये आग लागल्याची घटना घडली. स्मार्टफोन पेट घेण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास यासारखे घटना रोखता येऊ शकतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 17 एप्रिल : मागील काही महिन्यांपासून स्मार्टफोनमध्ये अचानक आग लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. नुकतंच इंडिगोच्या फ्लाइटमध्ये एक प्रवाशाच्या स्मार्टफोनमध्ये आग लागल्याची घटना घडली. स्मार्टफोन पेट घेण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास यासारखे घटना रोखता येऊ शकतात. स्मार्टफोन थेट हीटमध्ये ठेवणं हानिकारक ठरू शकतं. हे स्मार्टफोन पेट घेण्याचं महत्त्वाचं कारण ठरू शकतं. अधिक काळ फोन गरम ठिकाणी ठेवू नये. अनेक जण रात्री झोपताना फोन चार्जला लावतात. त्यानंतर तो फोन रात्रभर तसाच चार्ज होत राहिल्याने बॅटरी गरजेपेक्षा अधिक गरम होतं. यामुळे फोनमध्ये आग लागू शकते. स्मार्टफोन सांभाळून वापरणं गरजेचं आहे. जर स्मार्टफोन खाली पडला तर बाहेरुन त्याला इतकं काही नुकसान झालं नाही, तरी अंतर्गत नुकसान होऊ शकतं. समोरुन फोनला काहीही झालं नसलं, तरी फोन पडल्यावर त्याचा फोनच्या बॅटरीवर परिणाम होऊ शकतो. स्मार्टफोनवर अनेक कामं केली जातात. पण एकाच गेमिंग आणि मल्टी-टास्किंगमुळे फोनचा प्रोसेसर गरम होतो. यामुळे फोन पेट घेऊ शकतो.

हे वाचा -  Railway Ticket बुक करताना कशी मिळेल कन्फर्म लोअर बर्थ, IRCTC ने सांगितला नियम

स्मार्टफोन चार्ज करताना केवळ ब्रँडेड चार्जरचाच वापर करा. ज्या कंपनीचा चार्जर आहे किंवा जो फोनसोबत आला आहे तोच चार्जर वापरणं गरजेचं ठरतं. थर्ड पार्टी चार्जर किंवा लॉकर चार्जरमुळे फोनची बॅटरी खराब होऊ शकते आणि त्यामुळे बॅटरीमध्ये आगही लागू शकते. स्मार्टफोन चार्जला लावल्यानंतर तो वापरू नये ही सामन्य बाब सर्वांना माहिती आहे. पण तरीही अनेक युजर्स फोन चार्जिंगला लावून वापरतात, गेम खेळतात किंवा कॉलवर बोलतात. हेच नेमकं जीवघेणं ठरू शकतं. चार्जिंगवेळी स्मार्टफोनमधून हीट बाहेर येते. अशात त्याचा वापर केला तर फोन ओव्हर हीट होण्याचा धोका असतो. यामुळे फोन खराबही होऊ शकतो आणि ब्लास्टचाही धोका निर्माण होतो.  स्मार्टफोन वापरासंबंधीच्या अशा अनेक घटना युजरसाठी धोकादायक ठरू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात