नवी दिल्ली, 17 एप्रिल : सध्या अनेक कामांसह शॉपिंगही ऑनलाइन (Online Shopping) केलं जातं. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अनेक ऑफर्स, डिस्काउंट दिल्या (Online Shopping Offers and Discount) जातात. पण काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करताना हजारो रुपये वाचवू शकता. अनेकदा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आपण आपल्या आवडीची वस्तू कार्टमध्ये अॅड (Add to Cart) करुन सोडून देतो. पण अशाप्रकारे कार्टमध्ये अॅड करुन वस्तू तशीच ठेवू नये. कार्टमध्ये ठेवल्यानंतर दरदिवशी वस्तूची किमत वाढत जाते. ज्यावेळी कार्टमधील वस्तू खरेदी करतो तेव्हा किमत मोठ्या प्रमाणात वाढलेली असते. याकडे तितकंस लक्ष दिलं जात नाही. पण इथे पैसे मोठ्या प्रमाणात वाचू शकतात.
हे वाचा - तुमच्या फोनचा रंग कोणता आहे? सांगेल तुमचा स्वभाव आणि Personality
विकेंडला शॉपिंग केल्यावर वस्तू कमी किमतीत मिळेल असा अनेकांचा समज असतो. पण असं न होतो वस्तू स्वस्तऐवजी महाग मिळते. विकेंड डेजमध्ये सर्वात महागडं सामान मिळतं. कारण याच काळात सर्वाधिक युजर्स ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर शॉपिंग (Weekend Online Shopping) करतात. त्यामुळे रेट काही प्रमाणात वाढलेले असतात. त्यामुळे या दिवसांत शक्यतो शॉपिंग टाळू शकता. ऑनलाइन पेमेंट (Online Payment) करताना शक्यतो क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर करा. यामुळे शॉपिंगवेळी हजारो रुपयांची बचत करू शकता. क्रेडिट कार्डवर सतत चांगल्या ऑफर्स सुरू असतात. त्यामुळे पैशांची मोठी बचत होऊ शकते.
हे वाचा - UPI Payment चा वापर करता? चुकूनही करू नका हे काम, रिकामं होईल बँक अकाउंट
जर तुम्ही सेलच्या दिवसांत शॉपिंग करत असाल, तर सेलच्या सुरुवातीच्या दिवसांत शॉपिंग (Online Shopping Sale) करण्याचा प्रयत्न करा. सेलच्या सुरुवातीच्या काळात अधिक ऑफर्स आणि प्रोडक्ट्स मिळतात. तर सेलच्या शेवटच्या दिवसांत प्रोडक्ट्स अनेकदा ऑउट ऑफ स्टॉक होतात. त्यामुळे डिस्काउंट कमी होतो. त्यामुळे सुरुवातीला शॉपिंग करुन हव्या त्या वस्तू घेता येतात आणि पैसेही वाचवता येतात.