जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / भयंकर! Smartwatch मध्ये अचानक स्फोट; 4 वर्षांच्या चिमुकलीचं मनगट जळालं, थोडक्यात वाचला जीव

भयंकर! Smartwatch मध्ये अचानक स्फोट; 4 वर्षांच्या चिमुकलीचं मनगट जळालं, थोडक्यात वाचला जीव

भयंकर! Smartwatch मध्ये अचानक स्फोट; 4 वर्षांच्या चिमुकलीचं मनगट जळालं, थोडक्यात वाचला जीव

हातावर लावलेल्या स्मार्टवॉचमध्ये स्फोट झाल्याने एका चार वर्षाच्या चिमुकलीचं मनगट जळल्याची घटना घडली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 7 जुलै: स्मार्टफोनची बॅटरी फुटल्याच्या (Smartphone Battery Blast), त्याचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. पण आता एका स्मार्टवॉचमध्येच (Smartwatch) स्फोट झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. हातावर लावलेल्या स्मार्टवॉचमध्ये स्फोट झाल्याने एका चार वर्षाच्या चिमुकलीचं मनगट जळल्याची घटना घडली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - ही घटना चीनमधील (China) क्वानझोउ शहरातील आहे. एक चिमुकली यियी हुआंग हिच्यासोबत या महिन्याच्या सुरुवातीलाच हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी आपल्या लहान भावासोबत खेळत होती. त्याचवेळी तिच्या आजीने मोठा आवाज ऐकला आणि त्यानंतर किंचाळल्याचा, ओरडण्याचा आवाज आला.

(वाचा -  Alert! Smartphone युजर्स चुकूनही करू नका या गोष्टी, पडू शकतात महागात )

आजी ज्यावेळी बाहेर पाहण्यासाठी गेली, त्यावेळी हवेत धूर आणि जळण्याचा वास येत होता. त्यानंतर हा धूर त्यांना त्या चिमुकलीच्या हाताजवळच असल्याचं दिसलं, ती रडत असल्याचं त्यांनी पाहिलं. हे सर्व स्मार्टवॉचचा स्फोट (Smartwatch Blast) झाल्यामुळे झालं होतं.

(वाचा -  मागवलं एक आणि आलं भलतंच!Online Shopping मध्ये अशी झाली फसवणूक,पाहा विचित्र PHOTO )

त्या मुलीला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. स्फोटामुळे तिचा हात, मनगट मोठ्या प्रमाणात जळलं होतं. स्किन ग्राफ ही प्रक्रिया तिच्यावर करण्यात आली. हे स्मार्टवॉच नेमकं कोणत्या कंपनीचं होतं याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु मिळालेल्या माहितीनुसार, त्या मुलीचे वडील घडलेल्या या घटनेबाबत स्मार्टवॉच निर्मात्यांशी नुकसानभरपाईबाबत चर्चा करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात