• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • T20 World Cup : भारत-पाकिस्तान T20 मॅच पाहण्यासाठी 3GB नेटपॅक; रोमांच मिस करू नका हे आहेत Plans...

T20 World Cup : भारत-पाकिस्तान T20 मॅच पाहण्यासाठी 3GB नेटपॅक; रोमांच मिस करू नका हे आहेत Plans...

उद्या भारत आणि पाकिस्तानची T20 World Cup मधील हाय होल्टेज मॅच होणार आहे. आता प्रत्येकाला या मॅचबद्दल उत्सुकता आहे. परंतु ही मॅच पाहताना (India-Pakistan T20 match) आपला मोबाईल डाटा संपू नये आणि ही रोमांचकारी मॅच (T20 World Cup) आपल्याला पाहता यावी यासाठी आपल्यालाकडे चांगला डाटा प्लॅन असायला हवा.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : उद्या भारत आणि पाकिस्तानची T20 World Cup मधील हाय होल्टेज मॅच होणार आहे. आता प्रत्येकाला या मॅचबद्दल उत्सुकता आहे. परंतु ही मॅच पाहताना (India-Pakistan T20 match) आपला मोबाईल डाटा संपू नये आणि ही रोमांचकारी मॅच (T20 World Cup) आपल्याला पाहता यावी यासाठी आपल्यालाकडे चांगला डाटा प्लॅन असायला हवा. कारण ऐन मॅच रंगायला आल्यावर आपला डाटा संपला (3GB Netpack) की आपला हिरमोड होतो. त्यामुळं आपण अशा काही डाटा प्लॅन्स बद्दल माहिती घेऊयात की जे 3GB डाटा प्रतिदिवस असेल आणि विशेष म्हणजे आपल्याला त्याचा फायदा उद्याच्या भारत वि. पाकिस्तान सामना पाहताना होईल. Jio प्लॅन्स जियोच्या 499 च्या रिचार्जवर आपल्याला डिज्नी प्लस हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन आणि त्याबरोबर 3GB डाटा प्रतिदिन + 6GB अतिरिक्त डाटा आणि फ्री व्हाईस कॉलसह 100 SMS असलेला हा प्लॅन आपल्याला 28 दिवसांसाठी मिळत आहे. जगातील सर्वात मोठ्या लसीकरणासाठी फायदेशीर ठरलं Co-WIN App; काय आहे खासियत एयरटेल प्लॅन्स एयरटेलच्या 499 रूपयांच्या रिचार्जवर आपल्याला डिज्नी प्लस हॉटस्टारची मेंबरशिप, 3GB डाटा प्रतिदिवस, 100 SMS आणि अनलिमिटेड व्हाईस कॉलची सुविधा मिळत आहे. या रिचार्जचा कालावधी 28 दिवसांकरिता असणार आहे. Vodafone Idea प्लॅन्स Vodafone Idea च्या 501 रूपायांच्या या प्लॅनवर डिज्नी प्लस हॉटस्टारची मेंबरशिप 3GB प्रतिदिवस डाटासह 16GB चा अतिरिक्त डाटा, फ्री व्हाईस कॉल आणि Vi TV चा अॅक्सेस मिळतो. या प्लॅनची वैधता ही 28 दिवसांसाठी असेल. त्याचबरोबर Vodafone Idea च्या 701 रूपयांच्या रिचार्जवर 3GB प्रतिदिवस डाटा, 32GB एक्सट्रा डाटा, 100 SMS आणि अनलिमिटेड व्हाईस कॉलचा समावेश आहे. हा प्लॅन 56 दिवसांसाठी वैध असणार आहे. Twitter : ट्विटर करतोय उजव्या विचारांच्या ट्विटर हॅडल्सला प्रमोट - संशोधन Vodafone Idea ने यासंदर्भात आणखी एक प्लॅन आपल्या यूजर्सला दिला आहे. त्यात 901 रूपयांच्या रिचार्जवर 3GB प्रतिदिवसप्रमाणे डाटा आणि 48GB अतिरिक्त डाटा, फ्री व्हाईस कॉल आणि 100 SMS ची सुविधा दिली आहे. या प्लॅनची वैधता ही 84 दिवसांसाठी असणार आहे.
  Published by:Atik Shaikh
  First published: