नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : चीनमध्ये एका विद्यार्थ्याने Apple कंपनीचा स्मार्टफोन ऑर्डर केला. पण त्यात स्मार्टफोनचा चार्जर नसल्याने आता या विद्यार्थ्याने विद्यापीठातील काही मित्रांसोबत Apple कंपनीविरोधात फसवणुकीचा (apple Selling in china) गुन्हा दाखल केला आहे. या विद्यार्थ्यांनी दावा केला आहे, की ज्यावेळी स्मार्टफोन डिलीव्हर झाला त्यावेळी त्यासोबत यूएसबी-सी चार्जर देण्यात आलेला नव्हता. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांच्या ग्रुपने कंपनीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, Apple कंपनी वायरलेस चार्जरला प्राधान्य देण्यासाठी अशा फसवणुकीच्या गोष्टी करत आहे. आता विद्यार्थ्यांनी या फसवणूकीसाठी (Filed a fraud case against Apple company) कंपनीने 100 युआन म्हणजेच 1200 रूपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता Apple कंपनीच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांकडून दाखल झालेल्या खटल्यावर कंपनीने याबाबत न्यायालयात आपली बाजू मांडली. यावेळी बोलताना कंपनीने सांगितलं, की iPhone ची विक्री करताना त्याच्यासोबत चार्जर नसणं ही सामान्य बाब आहे. त्यासाठी सरकारनेही मंजूरी दिलेली आहे.
'Computer' आणि 'Mouse' ची जोडी आहे खास! या उपकरणाला 'माऊस' नावं आलं तरी कुठून?
त्यावर तक्रारदार विद्यार्थ्यानी बाजू मांडताना म्हटलंय, की अनेक चीनी कंपन्या या स्मार्टफोनसोबत चार्जरही देतात. यावेळी Apple कंपनीनेही चार्जर द्यायला हवं.
समोर आलेल्या रिपोर्टनुसार, आता या प्रकरणात संबंधित तक्रारदार विद्यार्थ्याला नुकसानभरपाई मिळणार की कंपनी आपल्या पॉलिसीत कुठला बदल करेल हे अजून स्पष्ट झालेलं नाही. जर कंपनीने या नियमांमध्ये बदल करण्याची तयारी दर्शवली तर त्यात स्मार्टफोनच्या चार्जरबाबत ऑप्शन दिला जाऊ शकतो.
6G in India: 5G सोबतच सरकार करतंय 6G नेटवर्कचीही तयारी; पाहा किती असेल स्पीड
दरम्यान, Apple कंपनीने काही दिवसांपूर्वी आपल्या स्मार्टफोन्समध्ये ऑपरेटिंग सिस्टम iOS14 चं अपडेट जारी केलं होतं. त्यानंतर आता त्या अपडेटवरून Apple आणि Facebook मध्ये वाद सुरू झाले आहेत. या अपडेटमुळे फेसबुकच्या (Apples ad blocking feature hurts Facebook) पेजेसवर देण्यात येणाऱ्या जाहिरातींवर त्याचा परिणाम होत असल्याची तक्रार फेसबुकने केली आहे. तर फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मचा वापर करून यूजर्सच्या डाटा चोरून आणि त्याद्वारे टार्गेटेड ऑडियन्स तयार करत असल्याचा आरोप अॅपलने फेसबुकवर (reducing traffic by 80 percent on Facebook) केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Apple, China, Smartphone