आपल्याकडे अद्याप 5G तंत्रज्ञान आले नसले, तरी बाजारात 5G सपोर्ट करणारे फोन येऊ लागले आहेत. जगाच्या तुलनेत भारतात 5G तंत्रज्ञान येण्यास उशीर झाला असला, तरी 6Gच्या बाबतीत असं होणार नाहीये. कारण सरकार आता 5G सोबतच 6Gचीही (6G internet in India) तयारी करत आहे. जगभरात अजून 6G टेक्नॉलॉजी (6G technology) आली नाही. पण जेव्हा ती येईल, तेव्हा देशातील लोकांना ती लवकरात लवकर मिळावी, अशा उद्देशाने हे पाऊल उचलण्यात येत आहे.
जगभरात कधी येऊ शकतं 6G
जगात साधारणपणे 2030 सालापर्यंत सर्वसामान्य लोकांच्या वापरासाठी 6G उपलब्ध (6G to be available soon) होईल, असं सांगण्यात येत आहे. हे लवकरच 5G ची जागा घेईल. कित्येक वैज्ञानिकांचं असंही मत आहे, की 6G आल्यानंतर मानवी मेंदू आणि कोणत्याही डिव्हाईसमध्ये थेट संपर्क करता येणं शक्य होणार आहे. 2030 पर्यंत अजून भरपूर वेळ असला, तरी सरकारने देशात 6G सुविधा उपलब्ध करण्यासाठी आतापासूनच तयारी (Government preparation for 6G internet) सुरू केली आहे. TV9 हिंदीने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
किती असेल 6Gचे स्पीड?
आपण आतापर्यंत 2G, 3G आणि 4G नेटवर्क अनुभवले आहे. 3Gच्या तुलनेत 4G नेटवर्क हे दहा पटींनी वेगवान होते. तर 5G नेटवर्कही 4Gच्या तुलनेत अधिक वेगवान असणार आहे. यावरूनच आपण 6G नेटवर्कच्या वेगाचा (6G internet speed) अंदाज बांधू शकतो. सध्या तुम्हाला एखादी गोष्ट डाउनलोड किंवा अपलोड करण्यासाठी काही तासांचा कालावधी लागणार असला, तरी 6G नेटवर्कच्या मदतीने हे काम अवघ्या काही मिनिटांमध्येच होऊ शकणार आहे.
हिवाळ्यात Hot Offer; या फ्रीजवर मिळतेय तब्बल 22 हजारहून अधिकची सूट, काय आहे ऑफर
सध्या LTE नेटवर्कवर आपल्याला सुमारे 50 मेगाबाइट प्रति सेकंद (MBPS) एवढे इंटरनेट स्पीड मिळत आहे. या स्पीडमध्ये 6 जीबीचा एक सिनेमा सुमारे 17 मिनिटांमध्य डाउनलोड होतो. 5G नेटवर्कवर हाच सिनेमा तुम्ही 8.5 मिनिटांमध्ये डाउनलोड करू शकता. तर 6G नेटवर्कवर तुम्ही हाच सिनेमा अवघ्या 51 सेकंदात डाउनलोड करू शकता. 6G नेटवर्कवर 1000 MBPS पर्यंत इंटरनेट स्पीड (6G network speed) मिळू शकते, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
एकूणच, देशातील नागरिकांना उत्तम प्रकारची इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. त्यामुळे 5G जरी इतर देशांच्या तुलनेत भारतात उशीरा आले असले, तरी 6G मात्र कदाचित इतर देशांसोबतच भारतात लाँच होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Technology