नवी दिल्ली, 15 जून : सुरक्षा ऐजन्सीजने फ्रॉड टू फोन (Fraud to Phone - F2P) नेटवर्कचा पर्दाफाश करत आठ लोकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून जवळपास 300 नवे फोन जप्त करण्यात आले आहेत, जे त्यांनी चोरीच्या पैशातून खरेदी केले होते. याशिवाय या टोळीच्या 900 मोबाईल फोन, 1000 बँक खाती आणि शेकडो युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI) आणि ई-कॉमर्स आयडीची ओळख केली असून त्यांचा तपास सुरू आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. ही टोळी अनेक राज्यांत पसरलेली होती.
गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'फ्रॉड टू फोन'च्या टोळीचे एकूण 8 मास्टरमाईंड अटक करण्यात आले आहेत. त्यापैकी चार झारखंड आणि प्रत्येकी दोन मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशातील आहेत. चोरी झालेल्या पैशातून या लोकांनी जवळपास 300 नवे मोबाईल जप्त केले आहेत. या टोळीविरोधातील मोहिम 18 राज्यांमध्ये सुरू होती आणि यात 350 लोक सामिल होते.
केंद्रीय गृह मंत्रालय, एफसीओआरडी, मध्य प्रदेश पोलीस आणि इतर काही राज्यांच्या पोलीस दलांनी मिळालेल्या माहितीवरुन ही कारवाई केली. 'सायबरसेफ' हे एफसीओआरडीने विकसित केलेलं App आहे, जे ऑगस्ट 2019 पासून कार्यरत आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उदयपूर येथे राहणाऱ्या एका 78 वर्षीय व्यक्तीने 11 जून रोजी साडे सहा लाख रुपयांच्या सायबर फसवणूकीची तक्रार गृह मंत्रालयाच्या सायबरसेफ App वर केली होती. फसवणूक करणारा झारखंडवरुन काम करत होता. तपासादरम्यान असं समोर आलं, की पैसे थेट तीन एसबीआय कार्डमध्ये जमा झाले होते, जे फ्लिपकार्टवरुन 33 शाओमीचे Pocco M3 मोबाईल फोन खरेदी करण्यासाठी वापरण्यात आले होते. काही मिनिटांत मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये ज्या फोनवरुन कॉल करण्यात आले होते याबाबत माहिती मिळाली आणि पुढील कारवाई करण्यात आली.
MHA’s CyberSafe is a comprehensive system meant to tackle digital frauds and making digital payments secure. This app leads to the neutralisation of a pan-India fraud gang spread over 18 States/UTs: Home Minister's Office pic.twitter.com/40HWsuWLh0
— ANI (@ANI) June 15, 2021
या टोळीने हे फोन प्रति फोन सुमारे दहा हजार रुपयांना विकत घेतले होते आणि ते 5 ते 10 टक्के सवलतीत काळ्या बाजारात विकले जात होते.
फ्रॉड टू फोन या टोळीत शेकडो सदस्य असतात जे ओटीपी फसवणूक, क्रेडिट कार्ड फसवणूक, ई-कॉमर्स फ्रॉड, बनावट आयडी, बनावट मोबाईल नंबर, खोटे पत्ते, ब्लॅक मार्केटिंग, कर चोरी, मनी लॉन्ड्रिंग आणि चोरलेल्या वस्तूंची खरेदी सामिल आहे. तसंच त्यांनी चिनी कंपनी निर्मित शाओमी फोनलाच प्राधान्य दिलं, याविषयीदेखील चौकशी सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyber crime, Online fraud, Tech news