मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Alert! एका चुकीने होईल बँक अकाउंट रिकामं, SBI ने Online Fraud बाबत केलं सावध

Alert! एका चुकीने होईल बँक अकाउंट रिकामं, SBI ने Online Fraud बाबत केलं सावध

स्टेट बँक ऑफ इंडियाने State Bank of India (SBI) आपल्या कोट्यवधी ग्राहकांना धोकादायक QR Code Scam बाबत इशारा दिला आहे. या स्कॅममुळे तुमचं बँक अकाउंट खाली होऊ शकतं.

स्टेट बँक ऑफ इंडियाने State Bank of India (SBI) आपल्या कोट्यवधी ग्राहकांना धोकादायक QR Code Scam बाबत इशारा दिला आहे. या स्कॅममुळे तुमचं बँक अकाउंट खाली होऊ शकतं.

स्टेट बँक ऑफ इंडियाने State Bank of India (SBI) आपल्या कोट्यवधी ग्राहकांना धोकादायक QR Code Scam बाबत इशारा दिला आहे. या स्कॅममुळे तुमचं बँक अकाउंट खाली होऊ शकतं.

नवी दिल्ली, 27 मार्च : इंटरनेट (Internet), सोशल मीडिया (Social Media), ऑनलाइन साधनांमुळे आपलं जीवन अधिक सोपं आणि सहज झालं आहे. एकीकडे एका क्लिकवर अनेक गोष्टी उपलब्ध होत असताना, दुसरीकडे ऑनलाइन फ्रॉड (Online Fraud), सायबर क्राइमच्या (Cyber Crime) घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दरदिवशी ऑनलाइन स्कॅमची प्रकरणं पुढे येत असून याची आकडेवारीही वाढती आहे. याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाने State Bank of India (SBI) आपल्या कोट्यवधी ग्राहकांना धोकादायक QR Code Scam बाबत इशारा दिला आहे. या स्कॅममुळे तुमचं बँक अकाउंट खाली होऊ शकतं.

SBI ने ग्राहकांना धोकादायक QR Code Scam बाबत सतर्क केलं आहे. SBI ने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात QR Code स्कॅन केल्यानंतर तुमच्या अकाउंटमधून कसे पैसे काढले जाऊ शकतात, याबाबत माहिती दिली आहे. ट्विट करत बँकेने QR Code स्कॅमबाबत सावध राहण्याचं सांगितलं आहे. कोणताही अनोळखी, अनवेरिफाइड QR Code स्कॅन न करण्याचा सावध इशारा बँकेने दिला आहे.

हे वाचा - सावधान! तुमचा स्मार्टफोन हॅक तर झाला नाही ना? अशी ओळखा फोनद्वारे होणारी हेरगिरी

अनेकदा लोक हॅकर्सने बनवलेला QR Code स्कॅन करतात. त्यामुळे पुढे मोठं नुकसान होऊ शकतं. QR Code स्कॅन केल्यानंतर एखादं App डाउनलोड करण्यासाठी कोणत्या लिंकवर रिडायरेक्ट केलं जात असेल, तर सावध व्हा.

हे वाचा - बाइकमध्ये 100-200 चं पेट्रोल भरता? तुम्हाला समजतही नाही आणि पंपावर अशी होते फसवणूक

अनेकदा हॅकर्स पेमेंट फेल झाल्यास पुन्हा या लिंकवर क्लिक करा असा ईमेल करतात आणि QR Code पाठवतात. कोणत्याही Gmail मध्ये आलेल्या कोड कोडवर क्लिक करू नका.

कोणत्याही व्यक्तीने QR Code स्कॅन करुन पैसे रिसीव्ह करण्याबाबत, पैसे मिळवण्याबाबत सांगितलं तर सावध व्हा. कारण एखाद्याकडून पैसे घेण्यासाठी QR कोड स्कॅन करावा लागत नाही. केवळ पैसे पाठवताना कोड स्कॅन करावा लागतो.

First published:

Tags: Cyber crime, Online fraud, QR code payment, Sbi alert, Tech news