जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / बाइकमध्ये 100-200 चं पेट्रोल भरता? तुम्हाला समजतही नाही आणि पंपावर अशी होते फसवणूक

बाइकमध्ये 100-200 चं पेट्रोल भरता? तुम्हाला समजतही नाही आणि पंपावर अशी होते फसवणूक

बाइकमध्ये 100-200 चं पेट्रोल भरता? तुम्हाला समजतही नाही आणि पंपावर अशी होते फसवणूक

अनेकदा ग्राहकांना काहीही समजण्याआधीच पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्याने फसवणूक (Petrol Pump Fraud) केलेली असते. परंतु या फसवणुकीपासून वाचता येऊ शकतं. यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं, सावध राहणं गरजेचं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 27 मार्च : मागील पाच दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या (Petrol - Diesel Price) किमतीत सतत वाढ होत आहे. अशात पेट्रोल पंपावर तुमची फसवणूक झाली तर मोठं नुकसान होऊ शकतं. अनेकदा ग्राहकांना काहीही समजण्याआधीच पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्याने फसवणूक (Petrol Pump Fraud) केलेली असते. परंतु या फसवणुकीपासून वाचता येऊ शकतं. यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं, सावध राहणं गरजेचं आहे. अनेकजण पेट्रोल पंपावर 100, 200 किंवा 500 अशा राउंड फीगर रुपयांचं पेट्रोल टाकण्याचं सांगतात. अनेकदा पेट्रोल पंपावर राउंट फीगर मशीनवर फिक्स करुन ठेवलं जातं आणि यात फसवणूक होऊ शकते. त्यामुळे राउंड फीगरमध्ये पेट्रोल भरू नये. राउंड फीगरहून 10-20 रुपये अधिक पेट्रोल भरावं. बाइक किंवा कारच्या रिकाम्या झालेल्या पेट्रोल टाकीत पेट्रोल भरताना नुकसान होतं. गाडीची पेट्रोल टाकी जितकी रिकामी तितकी त्यात हवा अधिक असते. अशात पेट्रोल भरल्यानंतर हवेमुळे पेट्रोल कमी होतं. त्यामुळे निम्मी टाकी नेहमी भरलेली ठेवणं फायद्याचं ठरतं. पेट्रोल चोरी करण्यासाठी पंपावर अनेकदा मीटरची हेराफेरी केलेली असते. जाणकारांनुसार अद्यापही अनेक पेट्रोल पंप जुन्या तंत्रावर चालतात, ज्यात हेराफेरी करणं सोपं होतं. त्यामुळे वेगवेगळ्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरा आणि तुमच्या गाडीचं मायलेज सतत चेक करत राहा. डिजीटल मीटर असणाऱ्या पंपावरच पेट्रोल भरा.

हे वाचा -  Car चालकांसाठी महत्त्वाचं! नितीन गडकरींची मोठी घोषणा, या तारखेपासून लागू होणार नवा नियम

पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना मशीनचं मीटर झिरोवर सेट आहे का हे तपासणं गरजेचं आहे. अनेकदा तुम्ही दिलेल्या पैशाच्या तुलनेत कमी पेट्रोल दिलं जातं. त्यांना याबाबत विचारल्यास मीटर झिरोवर सेट करत असल्याचं कारण दिलं जातं. आपलं लक्ष नसल्यास मीटर झिरोवर आणलं जात नाही. त्यामुळे ते तपासणं आवश्यक ठरतं. अनेकदा पेट्रोल मशीनमध्ये रीडिंग कोणत्या अंकापासून सुरू झालं हे पाहणं गरजेचं आहे. मीटरचं रीडिंग 10, 15, 20 पासून सुरू होताना दिसतं. परंतु मीटर रीडिंग कमीत कमी 3 पासून स्टार्ट होणं गरजेचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात