Home /News /technology /

SBI Alert! या लिंक्सवर चुकूनही क्लिक करू नका, एका चुकीने बसेल मोठा फटका

SBI Alert! या लिंक्सवर चुकूनही क्लिक करू नका, एका चुकीने बसेल मोठा फटका

स्टेट बँक ऑफ इंडियाने केव्हायसी फ्रॉडबाबत (KYC Fraud) आपल्या कोट्यवधी ग्राहकांना अलर्ट केलं आहे. SMS द्वारे पाठवण्यात आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचं बँकेने सांगितलं आहे.

  नवी दिल्ली, 7 मार्च : ऑनलाइन फ्रॉडच्या (Online Fraud) सतत वाढत्या घटना पाहता अनेक बँका, वित्तीय संस्था, टेलिकॉम कंपन्या वेळोवेळी आपल्या युजर्सला अलर्ट करत असतात. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँकेनेही पुन्हा एकदा ऑनलाइन फसवणुकीबाबत आपल्या ग्राहकांना अलर्ट केलं आहे. बँकिंग फ्रॉडमध्ये अधिकतर प्रकरणं केव्हायसी संबंधित असतात. त्यामुळे SBI ने कोणत्याही फोन कॉलवर किंवा SMS द्वारे केव्हायसी संबंधी विचारलं गेल्यास सावध व्हा. स्टेट बँक ऑफ इंडियाने केव्हायसी फ्रॉडबाबत (KYC Fraud) आपल्या कोट्यवधी ग्राहकांना अलर्ट केलं आहे. SMS द्वारे पाठवण्यात आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचं बँकेने सांगितलं आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर बँक खात्याचे डिटेल्स चोरी होण्याचा धोका आहे. 'प्रिय ग्राहक, तुमच्या SBI कागदपत्रांची वैधता संपली आहे. तुमचं खातं 24 तासात ब्लॉक केलं जाईल. तुमचे KYC अपलोड करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा http://ibit.ly/oMwK' असा मेसेज बँकेच्या नावाने केला जातो.

  हे वाचा - ATM मधून पैसे काढताना Green Light कडे लक्ष द्या, अन्यथा रिकामं होईल बँक अकाउंट

  बँकेने केलं अलर्ट - बँक कधीही SMS मध्ये एम्बेड लिंकवर क्लिक करुन आपलं KYC अपडेट करण्यासाठी सांगत नाही. त्यामुळे अशा कोणत्याही SMS मधील लिंकवर क्लिक करू नका. तसंच SMS ला उत्तरही देऊ नका. SBI ने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ट्विट करत सांगितलं, की अशा SMS मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचा बँक बॅलेन्स झिरो होऊ शकतो. SBI च्या नावाने कोणताही मेसेज मिळाल्यास बँकेचा शॉर्ट कोड चेक करा की तो योग्य आहे की नाही. अशा मेसेजमुळे फ्रॉड होऊ शकतो. एम्बेडेड लिंक्सवर क्लिक करू नका. बँक कधीही आपल्या ग्राहकांना SMS पाठवून एम्बेडेड लिंकवर क्लिक करुन KYC अपडेट करण्यासाठी सांगत नाही. KYC fraud, SBI Alert, Bank Fraud, Online Fraud, Cyber Crime News, Internet Fraud,

  हे वाचा - Smartphone मधून डिलीट केल्यानंतर स्टोर राहतात Photo, असा होऊ शकतो चुकीचा वापर

  सायबर क्राइम घटनांवर लगाम घालण्यासाठी गृह मंत्रालयाने सायबर दोस्त (Cyber Dost) नावाचं एक ट्विटर हँडल बनवलं आहे. सायबर दोस्त वेळोवेळी लोकांना अलर्ट करत असतं. सायबर दोस्त सार्वजनिक मोबाइल चार्जिंग स्टेशनवर कधीही फोन चार्ज न करण्याचं म्हटलं आहे. या चार्जिंग स्टेशनवर सायबर हॅकर्स आपल्या फोनद्वारे पर्सनल माहिती चोरी करू शकतात किंवा एखादा Malware इन्स्टॉल करू शकतात. सायबर क्राइमशी संबंधीत तक्रारीसाठी हेल्पलाइन नंबर 1930 जारी करण्यात आला आहे. इथे तुम्ही तुमच्या तक्रारी करू शकता.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Cyber crime, Online fraud, SBI

  पुढील बातम्या