नवी दिल्ली, 6 मार्च : जगभरात तंत्रज्ञानाने अनेक बदल केले. इंटरनेट, सोशल मीडियाच्या वापरामुळे अनेक गोष्टी सोयीच्या-सोप्या झाल्या. तर दुसरीकडे सायबर क्राइम, ऑनलाइन फ्रॉडच्या
(Online Fraud) संख्येतही मोठी वाढ झाली. एक छोटीशी चूकही मोठं नुकसान करू शकते. ऑनलाइन ट्रान्झेक्शनवेळी अनेकांची मोठी फसवणूक झाली आहे. ऑनलाइन ट्रान्झेक्शनसह एटीएममधूनही
(ATM) पैसे काढणं सुरक्षित नाही. एटीएम फ्रॉडसंबंधी अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. अशात एटीएममधून पैसे काढताना सतर्क राहणं गरजेचं आहे.
ATM मधून पैसे काढताना अलर्ट राहणं गरजेचं आहे. एटीएममध्ये सर्वात मोठा धोका कार्ड क्लोनिंगचा
(ATM Card Cloning) असतो. ATM मशीनमध्ये ज्याठिकाणी कार्ड स्लॉट असतो, तिथे फ्रॉड करुन हॅकर्स, फ्रॉडस्टर्स ग्राहकांची माहिती चोरी करतात.
डेटा चोरी करण्यासाठी ATM मशीनच्या कार्ड स्लॉटच्या जागी असं डिव्हाइस लावलं जात, ज्यात कार्डची संपूर्ण माहिती स्कॅन केली जाते. या डिव्हाइसमुळे ग्राहकाचे डिटेल्स डिव्हाइसमध्ये जातात. त्यानंतर ब्लूटूथ किंवा एखाद्या वायरलेस डिव्हाइसद्वारे डेटा चोरी केला जातो.
डेबिट कार्डचा अॅक्सेस मिळवण्यासाठी हॅकरकडे तुमच्या ATM चा पीन नंबर असणं गरजेचं असतं. यासाठीही फ्रॉड केला जातो. हॅकर्स पीन नंबर एखाद्या कॅमेराने ट्रॅक करतात. त्यामुळे ATM मधून पैसे काढताना पीन नंबर एंटर करताना दुसऱ्या हाताने तो झाकण्याचा प्रयत्न करा, जेणेकरुन कोणत्याही कॅमेराने तो पाहता येणार नाही.
अशी घ्या काळजी -
ATM मध्ये गेल्यावर मशीनचं कार्ड स्लॉट तपासा. कार्ड स्लॉटमध्ये काही गडबड वाटली किंवा स्लॉट हलत असल्याचं वाटलं, लूज वाटलं तर तो वापरू नका. कार्ड स्लॉटमधील हिरव्या लाइटकडे लक्ष द्या. हिरव्या रंगाची लाइट असल्यास एटीएम सुरक्षित आहे. हिरव्या रंगाऐवजी लाल किंवा इतर कोणत्या रंगाची लाइट असल्यास त्या एटीएमचा वापर करू नका. कोणताही ATM फ्रॉड झाल्यास त्वरित बँकेत तसंच पोलिसांकडे याची तक्रार करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.