Home /News /technology /

SBI Alert! या दोन तासांत उद्या इंटरनेट बँकिंगसह या सुविधा बंद राहणार

SBI Alert! या दोन तासांत उद्या इंटरनेट बँकिंगसह या सुविधा बंद राहणार

डिजीटल पेमेंट अधिक चांगलं करण्यासाठी बँक सतत मेंटनेंस आणि अपग्रेडेशनचं काम करते.

  नवी दिल्ली, 16 जून : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) आपल्या ग्राहकांना अलर्ट केलं आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक ट्विट केलं आहे, ज्यात उद्या गुरुवारी 17 जून रोजी, दोन तासांसाठी बँकेच्या काही सर्विसेस बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे. यादरम्यान ग्राहकांना काही सुविधांचा वापर करता येणार नाही. ग्राहकांना डिजीटल पेमेंटमध्ये कोणतीही समस्या येऊ नये, यासाठी बँक अपग्रेडेशनचं काम करत आहे. त्यासाठीच दोन तासांसाठी SBI ग्राहक इंटरनेट बँकिंगचा वापर करू शकणार नाहीत. State Bank of India आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी काम करत आहे. हेच कारण आहे, की डिजीटल पेमेंट अधिक चांगलं करण्यासाठी बँक सतत मेंटनेंस आणि अपग्रेडेशनचं काम करते. गुरुवारीही अपग्रेडेशनचं काम होणार आहे. SBI ने दिलेल्या माहितीनुसार, 17 जून 2021 रोजी रात्री साडेबारा ते रात्री अडीचपर्यंत बँक मेंटनेंस सुरू राहिल. त्यामुळे या दोन तासांत इंटरनेट बँकिंग (SBI Internet Banking), योनो अ‍ॅप (YONO App), योनो लाईट (YONO Lite) आणि यूपीआय (UPI) बंद राहणार आहे. ग्राहक या सेवांचा वापर करू शकणार नाहीत.

  (वाचा - महाराष्ट्रातल्या 21 वर्षीय विद्यार्थ्याने Instagram मध्ये सांगितली मोठी त्रुटी, Facebook ने दिले 22 लाख रुपये)

  काय आहे YONO App - YONO App एक इंटिग्रेटेड डिजीटल बँकिंग प्लॅटफॉर्म आहे. SBI युजर्स यात फायनेंशिअल सर्विसेससह इतर सुविधा फ्लाईट, ट्रेन, बस, टॅक्सी बुकिंग, ऑनालाईन शॉपिंग किंवा मेडिकल बिल पेमेंटचा वापर करू शकतात. Android आणि iOS दोन्ही स्मार्टफोनवर YONO वापरता येतं.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: SBI, Sbi alert, Tech news

  पुढील बातम्या