मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Samsung चं जबरदस्त चार्जर, एकाच वेळी काही मिनिटांत चार्ज करणार तीन Smartphone; पाहा फीचर्स आणि किंमत

Samsung चं जबरदस्त चार्जर, एकाच वेळी काही मिनिटांत चार्ज करणार तीन Smartphone; पाहा फीचर्स आणि किंमत

Samsung अशा एका चार्जरवर काम करत आहे, ज्याद्वारे एकाचवेळी तब्बल तीन चार्जर फास्ट चार्ज केले जाऊ शकतात. EP-T6530 असं या चार्जरचं नाव आहे.

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : प्रसिद्ध कोरियन स्मार्टफोन कंपनी Smartphone शिवाय अनेक प्रकारच्या Electronic Accessories ची देखील विक्री करते. त्यातच आता Samsung अशा एका चार्जरवर काम करत आहे, ज्याद्वारे एकाचवेळी तब्बल तीन चार्जर फास्ट चार्ज केले जाऊ शकतात. EP-T6530 असं या चार्जरचं नाव आहे. या चार्जरमध्ये इतरही अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

एकाच वेळी चार्ज करता येणार तीन स्मार्टफोन -

सॅमसंग बनवत असलेल्या या Charging Adapter च्या माध्यमातून युजर्सला एकाचवेळी तीन स्मार्टफोन चार्ज करता येणार आहे. युजर्सला प्रवासादरम्यान याचा उपयोग करता येणार आहे. त्याचबरोबर आता या चार्जरच्या वापरामुळे पॉवर बँकचा वापरही कमी होणार आहे.

तुम्हाला माहितेय कशी बनते काच? प्रक्रिया पाहून व्हाल थक्क

फास्ट चार्जिंगची असेल सुविधा -

सध्या युरोपमध्ये काही वेबसाईट्सवर सॅमसंगच्या EP-T6530 चार्जरसारखेच काही चार्जर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या चार्जरच्या लॉन्चिंगबद्दल सॅमसंगने अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या चार्जरचा वापर करून युजर्सला गॅलेक्सी बुक, गॅलक्सी S21, आणि गॅलक्सी Z Flip3 फास्ट चार्ज करता येणार आहे. त्यामुळे सॅमसंगच्या युजर्सला याचा मोठा फायदा होणार आहे.

काय असतील फीचर्स?

सॅमसंगच्या EP-T6530 या चार्जरमध्ये काय फीचर्स असतील याबाबत कंपनीने अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. पण समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार यात मॅक्सिमम पॉवर आउटपुट 65W किंवा 105W असणार आहे.

सावधान! Amazon कडे आहे तुमचा सर्व प्रायव्हेट डेटा? पाहा काय आहे प्रकरण...

त्याचबरोबर यामध्ये तीन पोर्ट असतील. त्यात 1x 65W USB Type-C, 1x 25W USB Type-C आणि 1x 15W USB Type-A असणार आहे. शिवाय या चार्जरची किंमत 4,600 रुपये असणार असल्याचीही माहिती मिळत आहे.

First published:

Tags: Samsung, Samsung galaxy