मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

तुम्हाला माहितेय कशी बनते काच? प्रक्रिया पाहून व्हाल थक्क

तुम्हाला माहितेय कशी बनते काच? प्रक्रिया पाहून व्हाल थक्क

  दैनंदिन व्यवहारात तुम्ही अनेक प्रकारच्या वस्तू वापरत असालच. त्यामध्ये एखादी तरी वस्तू बनवण्यासाठी काचेचा (Glass) उपयोग केला असणारच. एवढचं काय, तुम्ही दररोज वापरणाऱ्या मोबाइलमध्येही  ( mobiles )  काचेचा वापर केलेला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, काच कशापासून तयार केली  (What Is Glass Made Of)  जाते ?

पुढे वाचा ...

मुंबई, 23 नोव्हेंबर-  दैनंदिन व्यवहारात तुम्ही अनेक प्रकारच्या वस्तू वापरत असालच. त्यामध्ये एखादी तरी वस्तू बनवण्यासाठी काचेचा (Glass) उपयोग केला असणारच. एवढचं काय, तुम्ही दररोज वापरणाऱ्या मोबाइलमध्येही  ( mobiles )  काचेचा वापर केलेला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, काच कशापासून तयार केली  (What Is Glass Made Of)  जाते ? तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आहे वाळूपासून. झी न्यूजने याबाबत वृत्त दिलं आहे.

तुम्ही तुमच्या आजूबाजूला काचेच्या अनेक वस्तू पाहिल्या असतील. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, काच बनवण्याची प्रक्रिया खूप कठीण  (very difficult)  आहे. यासाठी अनेक टप्पे ( many stages ) पार करावे लागतील. चला जाणून घेऊया काच कशापासून आणि कशी बनवली जाते ते.

काचेचे प्रकार

आधुनिक काचेचा शोध जर्मन शास्त्रज्ञ जस्टस वॉन लीबिग (Justus Von Liebig) यांनी 1835 मध्ये लावला होता. काचेचे पारदर्शक काच, अपारदर्शक काच आणि अल्प पारदर्शक काच, असे तीन प्रकार आहेत. पारदर्शक काचेतून तुम्ही आरपार पाहू शकता. अपारदर्शक काचेतून पलीकडचं काहीही दिसत नाही. तर, अल्प पारदर्शक काचेतून थोडंस आरपार (स्पष्ट नव्हे) दिसतं. काच वाळूपासून बनवली जाते. पण काच बनवण्यासाठी जी वाळू वापरली जाते त्यामध्ये सिलिकाचे प्रमाण 99 टक्के असते.

वाळूसोबत वापरली जाते चुनखडी

काच तयार करण्यासाठी प्रथम 75 टक्के वाळू, 15 टक्के सोडा राख (Soda Ash) आणि 10 टक्के चुनखडी (Limestone) एकत्र करून मिश्रण (Mixture) तयार केलं जातं. या मिश्रणात रिसायकल (Recycle) करताना काट्यांचे तुकडेही टाकले जातात. नंतर हे मिश्रण 800 ते 1500 डिग्री सेल्सिअस तापमानात भट्टीत (Furnace) गरम करून वितळवलं जातं. हे मिश्रण वितळल्यानंतर, ते एका सपाट प्लॅटफॉर्मवर पसरलं जातं. ते पूर्णपणे थंड झाल्यावर पारदर्शक काच तयार होते.

(हे वाचा:तुमचा Apple iPhone ओरिजनल की बनावट, ओळखा अशा प्रकारे)

काचेला इतर कोणत्याही आकारात मोल्ड करायचे असल्यास, हे वितळलेलं मिश्रण वेगवेगळ्या साच्यांमध्ये ओतलं जातं. काचेपासून बनवलेल्या तुमच्या आजूबाजूच्या खिडक्या, भांडी, फोनची स्क्रीन अशा अनेक गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील. पण काच वाळूपासून बनवली जाते, असा विचार तुम्ही कधी केला नसेल. मात्र, हे खरे आहे.दररोज तुम्ही एखादी तरी काचेची वस्तू हाताळत असताल. काचेची वस्तू वापरताना खूप काळजी घेत असालच. कारण काचेची वस्तू फुटण्याची भीती असते. परंतु ही काच वाळूपासून बनवली जाते, व त्यासाठी खूप मोठी प्रक्रिया असते, असा तुम्ही कधीही विचारही केला नसेल. आता तुम्हाला माहिती झालं काच कशी तयार होते ते. पुढच्यावेळी काचेची वस्तू हाताळताना तुम्हाला ही माहिती आठवेल.

First published:

Tags: Technology